नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई महामार्गावरील मुंढेगाव येथे झालेल्या अपघातात एक ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना शुक्र वारी (दि. ११) घडली. मुंढेगाव ते विल्होळीदरम्यान सुरू असलेली अपघातांची मालिका खंडित कधी होणार, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील मुंढेगाव येथे मुंबईकडे जाणाऱ्या रिक्षाला (एमएच ०५ डीके १०३४)अर्टिगा कार (एमएच ०१ सीडी ९८९१) जोरदार धडक दिल्याने रिक्षा रस्त्याच्या खाली उलटली. या अपघातात रिक्षाचा चालक अजय पटेल (४५, रा. विपी, जि. देवरा) हा जागीच ठार झाला असून, बिसाल गुप्ता (२६), रोहित गुप्ता (२७), जालंदर यादव (३२) सर्व रा. सर्व विपी, जि. देवरा हे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती घोटी पोलीस स्टेशनला दिल्यानंतर पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर गोंदे फाटा येथील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रु ग्णवाहिकेतून जखमींना घोटी येथील ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले, तर कारच्या चालकास घोटी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठारनांदूरशिंगोटे : नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे शिवारात गुरु वारी मध्यरात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत अज्ञात इसम ठार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात शिपाई सुधाकर चव्हाणके यांनी फिर्याद दिली. नांदूरशिंगोटे शिवारातील हॉटेल वनपीसजवळ रस्त्याने जाणाºया अज्ञात वाहनाने पायी चालणाºया अज्ञात इसमास ठोस मारून पळून गेला असल्याचे पोलिसांना दिसून आले. मयत इसमाचे अंंदाजे ३५ ते ४० वय असून अंगात निळ्या, सफेद लाल रंगाचा शर्ट, आकाशी रंगाची जिन्स पॅन्ट, डाव्या बाजूच्या छातीवर मंगल, व उजव्या हाताच्या दंडावर नामदेव व मनगटाच्या काबीवर जालू असे नाव गोंदलेले आहे. याबाबत वावी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, पोलीस हवालदार प्रवीण अंढागळे यांनी केले आहे.
नाशिक - मुंबई महामार्गावरील मुंढेगाव येथील अपघातात रिक्षाची झालेली अवस्था.जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात दोन ठारमुंढेगावजवळील अपघातात तीन जखमी; पोलिसांत गुन्हा दाखलनांदूरवैद्य : नाशिक - मुंबई महामार्गावरील मुंढेगाव येथे झालेल्या अपघातात एक ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना शुक्र वारी (दि. ११) घडली. मुंढेगाव ते विल्होळीदरम्यान सुरू असलेली अपघातांची मालिका खंडित कधी होणार, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील मुंढेगाव येथे मुंबईकडे जाणाऱ्या रिक्षाला (एमएच ०५ डीके १०३४)अर्टिगा कार (एमएच ०१ सीडी ९८९१) जोरदार धडक दिल्याने रिक्षा रस्त्याच्या खाली उलटली. या अपघातात रिक्षाचा चालक अजय पटेल (४५, रा. विपी, जि. देवरा) हा जागीच ठार झाला असून, बिसाल गुप्ता (२६), रोहित गुप्ता (२७), जालंदर यादव (३२) सर्व रा. सर्व विपी, जि. देवरा हे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती घोटी पोलीस स्टेशनला दिल्यानंतर पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर गोंदे फाटा येथील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रु ग्णवाहिकेतून जखमींना घोटी येथील ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले, तर कारच्या चालकास घोटी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठारनांदूरशिंगोटे : नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे शिवारात गुरु वारी मध्यरात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत अज्ञात इसम ठार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात शिपाई सुधाकर चव्हाणके यांनी फिर्याद दिली. नांदूरशिंगोटे शिवारातील हॉटेल वनपीसजवळ रस्त्याने जाणाºया अज्ञात वाहनाने पायी चालणाºया अज्ञात इसमास ठोस मारून पळून गेला असल्याचे पोलिसांना दिसून आले. मयत इसमाचे अंंदाजे ३५ ते ४० वय असून अंगात निळ्या, सफेद लाल रंगाचा शर्ट, आकाशी रंगाची जिन्स पॅन्ट, डाव्या बाजूच्या छातीवर मंगल, व उजव्या हाताच्या दंडावर नामदेव व मनगटाच्या काबीवर जालू असे नाव गोंदलेले आहे. याबाबत वावी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, पोलीस हवालदार प्रवीण अंढागळे यांनी केले आहे.