रवी काशिनाथ भोये (२९, रा. बाफणविहीर, ता. त्र्यंबकेश्वर) व सुनील (गणेश) तुकाराम हळकुंडे (२६, रा. आडवाडी, ता. सिन्नर) अशी दोघा मृतांची नावे आहेत. सुनील हळकुंडे हा खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता. काम आटोपल्यानंतर स्प्लेंडर मोटारसायकलने (एमएच १५ सीएफ ०८५६) घोटी महामार्गाने तो आडवाडीकडे जात होता. त्याच सुमारास विरुध्द दिशेने रवी भोये याची हिरो शाईन मोटारसायकल (एमएच १५ एचए ६८२७) येत होती. या दोघांची हरसुले फाट्याजवळ प्राथमिक शाळेच्यासमोर समोरासमोर जोरदार धडक झाली. त्यात गंभीर दुखापती झाल्याने सुनील हळकुंडे व रवी भोये यांचा जागीच मृत्यू झाला, तर भोये याच्या मोटारसायकलवर मागे बसलेला एक गंभीर जखमी असून त्याला उपचारांसाठी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
फोटो- २३सुनील हळकुंडे