बुंधाटे येथील माजी सरपंच नंदुदास बैरागी यांचा मुलगा अनंत बैरागी हा आपल्या शेतात जाण्यासाठी दुचाकीने (एम एच ४१ ए. ए एल ८४१७) निघाले असता शेतापासून हाकेच्या अंतरावर कळवणकडून येणाऱ्या दुचाकी (एम एच ४१ एव्ही ३२६२)ची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकी चालक अनंत नंदूदास बैरागी (३२) रा. बुंधाटे व किरण सुभाष सोनवणे (१८) रा. किकवारी बुद्रुक यांचा या अपघातात गंभीर मार लागल्याने ग्रामीण रुग्णालय डांगसौंदाणे येथे आणण्यात आले असता दोघांना मृत घोषित करण्यात आले.
दोघा जखमींना नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. याबाबत सटाणा पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा तपास सटाणा पोलीस निरीक्षक सुहास अनमोलवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जयतसिंग सोळंकी, पोलीस शिपाई निवृत्ती भोये, पो. ना. पंकज सोनवणे, सागर बेलुस्कर, नीलेश पवार हे करत आहेत.
हा अपघात इतका भीषण होता की दोघाही दुचाकींचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. अपघातातील तरुण अनंत बैरागी हा बुंधाटेचे उपसरपंच नंदूदास बैरागी यांचा मुलगा असून किकवारी येथील मृत तरुण आदिवासी गरीब कुटुंबातील आहे.
(०१ सटाणा ॲक्सिडेंट)
010921\01nsk_52_01092021_13.jpg
दुचाकी अपघातात दोन जागीच ठार.