मांडवड : कोरोनामुळे नांदगाव तालुक्यातील १२० ऊसतोडणी मजूर मध्य प्रदेशातील बेतूल जिल्ह्याच्या आमला तालुक्यात अडकून पडले असून, त्यांची सध्या उपासमार होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या मजुरांना नांदगाव तालुक्यातील आपल्या गावी आणण्यासाठी खासदार डॉ. भारती पवार यांना साकडे घातले आहे.दिवाळीचा सण आटोपल्यावर नांदगाव तालुक्यातील भौरी येथील मुकादम हरिभाऊ अंबादास दाभाडे हे तालुक्यातील भालूर, भौरी, नागापूर, वडाळी, कासारी व येवला तालुक्यातील बाळापूर येथील एकूण १२० मजुरांना घेऊन मध्य प्रदेशातील साखर कारखान्याच्या ठिकाणी ऊसतोडणी साठी गेले होते. तेथील ऊसतोडणीचे काम आटोक्यात येत असताना देशात कोरोनाने थैमान घातले आणि सर्वत्र लॉकडाउनचे आदेश काढण्यात आले. त्यामुळे हे कामगार त्या परिसरातच अडकले. त्यांच्याकडे अन्नधान्य तसेच पैसे संपल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.मुकादम दाभाडे यांनी नांदगावचे तहसीलदार व लोकप्रतिनिधी यांच्याकडे आठ दिवसांपासून मध्य प्रदेशातून सुटका करण्यासाठी याचना केल्या, मात्र कोणीही हालचाली केल्या नसल्याची भावना मुकादम दाभाडे यांनी यावेळी व्यक्त केली.४खासदार डॉ. भारती पवार यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधला असता त्यांनी बेतूलचे खासदार उलके यांच्याशी बोलल्यावर त्या मजुरांच्या अन्न पाण्याची सोय होणार असल्याचे दाभाडे यांनी सांगितले.
१२० मजूर अडकले मध्य प्रदेशात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 9:44 PM
मांडवड : कोरोनामुळे नांदगाव तालुक्यातील १२० ऊसतोडणी मजूर मध्य प्रदेशातील बेतूल जिल्ह्याच्या आमला तालुक्यात अडकून पडले असून, त्यांची सध्या उपासमार होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या मजुरांना नांदगाव तालुक्यातील आपल्या गावी आणण्यासाठी खासदार डॉ. भारती पवार यांना साकडे घातले आहे.
ठळक मुद्देनांदगाव : गावी परतण्यासाठी खासदारांना साकडे, उपासमारीची वेळ