घोटी : खंबाळे ता. इगतपुरी येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने कपाटातील ६५ हजार रोख रक्कमेसह सव्वा लाख रु पयांचे दागिने लंपास केल्याची घटना सोमवारी घडली. याबाबत घोटी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरु द्ध गुन्हा दाखल केला आहे.खंबाळे येथील संतोष कचरू देवकर हे पत्नी व मुलासह राहतात. त्यांचा शेळीपालन हा व्यवसाय असून ते दिवाळीच्या सणासाठी गावात आले होते. मात्र सण संपल्यावर हे कुटुंब घराच्या दोन्ही दरवाजाला कुलूप लावून मळ्यावर राहण्यास गेले होते.दरम्यान मंगळवारी (दि.१३) सकाळी संतोष हे घरी आले असता घराचे कुलूप तोडल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्याने घरात जाऊन तपासणी केली असता कपाटातील ६५ हजार रु पये आणि सव्वा लाख रु पये किमतीचे दागिने या चोरट्याने लंपास केल्याचे लक्षात आले.घोटी पोलिसांना या बाबत माहिती दिली. घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार धर्मराज पारधी, कृष्णा कोकाटे आदींनी घटनास्थळी बहाणी केली असता चोरट्याने चोरी करून दागिने आणि पैशाच्या बॅग गावाजवळ फेकून दिल्याचे आढळून आले. दरम्यान याबाबत पोलिसांनी ठसेतज्ज्ञांची मदत घेतली मात्र यश आले नाही.
खंबाळे येथे दोन लाखाची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 7:27 PM
घोटी : खंबाळे ता. इगतपुरी येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने कपाटातील ६५ हजार रोख रक्कमेसह सव्वा लाख रु पयांचे दागिने लंपास केल्याची घटना सोमवारी घडली. याबाबत घोटी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरु द्ध गुन्हा दाखल केला आहे.
ठळक मुद्दे ठसेतज्ज्ञांची मदत घेतली मात्र यश आले नाही.