शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

येवल्यात कारमधून दोन लाखांची रोकड लंपास

By admin | Published: May 09, 2016 11:39 PM

येवल्यात कारमधून दोन लाखांची रोकड लंपास

येवला : सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शहरातील फत्तेबुरुज नाक्याजवळ गाडीचे आॅइल गळती होत असल्याचा बहाणा करून अज्ञात चोरट्याने दोन लाख ३० हजार रुपयांची रोकड असलेली बॅग मारु ती व्हॅनमधून लंपास केल्याची घटना घडली. संतोष अशोक शिंदे (रा. आंचलगाव, ता. कोपरगाव) हा मारु ती व्हॅन (क्र. एमएच १५ ईपी ५१०६) गाडीतून मनमाड येथील आपल्या पाहुण्याकडून पाइपलाइनच्या कामासाठी दोन लाख रुपये घेऊन येवला येथे आला होता. दरम्यान, बँक आॅफ इंडियामधून ३० हजार रु पयांची रक्कमही काढली. मारु ती व्हॅन घेऊन दुपारी दीडच्या सुमारास संतोष शहरातील फत्तेबुरुज नाक्याजवळ फरसाण घेण्यासाठी उभा राहिला. त्याचा मित्र फरसाण घेण्यासाठी खाली उतरला. दरम्यान, २५ ते ३० वर्षे वयोगटातील एक तरु ण गाडीत बसलेल्या संतोषजवळ आला. गाडीतून आॅइलची गळती होत असल्याचे त्याने सांगितले. आॅइल गळती पाहण्यासाठी संतोष गाडीच्या खाली उतरला व आॅइल गळतीची खात्री करण्यासाठी इंजिनच्या खाली वाकला असता या अवघ्या दोन मिनिटाच्या कालावधीत संतोषची दिशाभूल करणाऱ्या या अज्ञात चोरट्याने गाडीत ठेवलेली दोन लाख तीस हजार रुपये ठेवलेली बॅग पळविली. या प्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येवला शहर सहायक पोलीस निरीक्षक विश्वासराव निंबाळकर यांच्यासह पोलीस ताफ्याने घटनास्थळासह परिसर पिंजून काढला परंतु तपास लागू शकला नाही. सतत होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. (वार्ताहर)