नाशिक : जुने नाशिक परिसरातील आर्थिक व्यवहारात ११ किलो चांदीचे ठरल्याप्रमाणे सव्वा तीन लाखांपैकी केवळ दीड लाख रुपये देऊन पावणे दोन लाखांचा अपहार केल्याची घटना घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी योगेश रवींद्र आष्टेकर (रा. भद्रकाली) यांनी भद्रकाली पाेलीस ठाण्यात संशयित मयूर राजमल पाटील (रा. एक्सलो पॉइंटजवळ) याच्याविरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे. योगेश यांच्या फिर्यादीनुसार १६ जून रोजी सुमारे ११ किलो चांदी दिली. त्या मोबदल्यात मयूरने सव्वा तीन लाख रुपयांपैकी दीड लाख रुपये रोख स्वरूपात दिले, तर उर्वरित एक लाख ७५ हजार रुपये देण्यास वारंवार टाळाटाळ केली. योगेश यांनी वारंवार मागणी करूनही पैसे दिले नाही. त्यामुळे आष्टेकर यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज केला. मात्र, गुन्हा दाखल न झाल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार संशयित मयूर विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
११ किलो चांदीच्या व्यवहारात पावणे दोन लाखांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2021 12:54 AM
जुने नाशिक परिसरातील आर्थिक व्यवहारात ११ किलो चांदीचे ठरल्याप्रमाणे सव्वा तीन लाखांपैकी केवळ दीड लाख रुपये देऊन पावणे दोन लाखांचा अपहार केल्याची घटना घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ठळक मुद्देफसवणूक : न्यायालयीन आदेशानुसार गुन्हा