मनमाड : मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकावर रेल्वेच्या विशेष पथकाकडून राबवण्यात आलेल्या धडक कारवाई मध्ये फुकट्या प्रवाशांकडून तब्बल पावणेदोन लाख रु पयांची दंडात्मक वसुली करण्यात आली आहे.भुसावळ विभागाचे वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक आर. के. शर्मा, सहायक प्रबंधक अजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली २३ पथकांनी मनमाड रेल्वे स्थानकावर धडक तिकीट तपासणी मोहीम राबवली. रेल्वे सुरक्षा बलाच्या पाच पथका सोबत राबवण्यात आलेल्या या मोहिमेत २६२ अनियमित प्रवाशांकडून १ लाख ६८ हजार ४७२ रु पयांची दंडात्मक वसुली करण्यात आली. यामध्ये विनातिकीट ८७ प्रवाशी तर अनियमित प्रवास करणाऱ्या १७५ प्रवाशांचा समावेश आहे. यावेळी मुख्य तिकीट निरीक्षक वाय. डी. पाठक यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
रेल्वे स्थानकावर फुकट्या प्रवाशांकडून पावणेदोन लाख रु पयांची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 19:17 IST
मनमाड : मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकावर रेल्वेच्या विशेष पथकाकडून राबवण्यात आलेल्या धडक कारवाई मध्ये फुकट्या प्रवाशांकडून तब्बल पावणेदोन लाख रु पयांची दंडात्मक वसुली करण्यात आली आहे.
रेल्वे स्थानकावर फुकट्या प्रवाशांकडून पावणेदोन लाख रु पयांची वसुली
ठळक मुद्देमनमाड : विशेष पथकाकडून राबवण्यात आली धडक कारवाई