नाशिक : महापालिका निवडणूक मतदानाच्या दिवशी शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहतूक करणाऱ्या ६३ वाहनधारकांविरुद्ध शहर वाहतूक शाखेने कारवाई करून १ लाख ७४ हजार रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त जयंत बजबळे यांनी दिली आहे़ महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.२१) मतदान झाले़ या कालावधीत मतदारांना प्रलोभने तसेच टवाळखोरांचा उपद्रव टाळण्यासाठी मतदानाच्या दोन दिवस अगोदरपासूनच वाहतूक शाखा सज्ज होती़ शहरात ठिकठिकाणी वाहन तपासणी तसेच नाकाबंदी करून विशेष मोहीम राबविण्यात आली़ या मोहिमेत ६३ वाहनधारकांवर फौजदारी कारवाई करण्यात आली़ त्यापैकी ४३ वाहनधारकांना न्यायालयाने १ लाख ७४ हजार रुपयांचा दंड ठोठावला ़ दरम्यान, निवडणूक मतमोजणीच्या दिवशीही वाहतूक विभागाकडून कारवाई सुरू राहणार असून, दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना हेल्मेट आणि सीट बेल्टचा वापर करण्याचे आवाहन बजबळे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
बेशिस्त वाहनचालकांकडून दोन लाखांचा दंड वसूल
By admin | Published: February 23, 2017 12:10 AM