निफाड/चांदोरी : निफाड तालुक्यात वस्ती तसेच शेतात सद्या बिबट्याचा वावर वाढला असून करंजगाव येथे मंगळवारी सकाळी २ बछडे आढळून आले. त्यांना स्थानिक शेतकरी यांनी वनविभागाच्या स्वाधीन केले. मागील आठवड्यात दोन बछडे आढळून आले होते.निफाड तालुक्यातील करंजगाव येथे मंगळवारी (ददि.१६) पहाटेच्या सुमारास निवृत्ती राजोळे यांच्या (गट क्र ८९१) शेतात दोन बछडे आढळून आले. त्यांचे वय अंदाजे एक ते दोन महिने आहे.सदर घटनेची माहिती वनविभागास देऊन तत्काळ अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सदर बछड्यांना ताब्यात घेऊन निफाड येथील पशु रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र चांदोरे यांनी तपासणी केली व दोन्ही बछडे मादी असल्याची माहिती दिली. या वेळी वनविभाग अधिकारी सुजित नेवसे, वनसंरक्षक बशीर शेख, वनक्षेत्रपाल जाधव, महाले, वनरक्षक विंचूर इत्यादी हजर होते.
करंजगाव येथे आढळले बिबट्याचे दोन बछडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 6:33 PM
निफाड/चांदोरी : निफाड तालुक्यात वस्ती तसेच शेतात सद्या बिबट्याचा वावर वाढला असून करंजगाव येथे मंगळवारी सकाळी २ बछडे आढळून आले. त्यांना स्थानिक शेतकरी यांनी वनविभागाच्या स्वाधीन केले. मागील आठवड्यात दोन बछडे आढळून आले होते.
ठळक मुद्देशेतात दोन बछडे आढळून आले. त्यांचे वय अंदाजे एक ते दोन महिने आहे.