- शैलेश कर्पेनाशिक - नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील सांगवी येथे दोन बिबटे नारळाच्या झाडावर सरसर चढून पुन्हा खाली उतरत मस्ती करीत असल्याचे दृश्य शेतक-याने मोबाईलच्या कॅमे-यात शुटींग केले. या दोन बिबट्यांची नारळाच्या झाडावर चाललेली मस्ती वाºयासारखी व्हायरल झाली. वनविभागाचे रेस्क्यू पथक घटनास्थळी रवना झाले.
सिन्नर तालुक्यातील सांगवी येथे शांताराम घुमरे आणि सुनील सखाहरी घुमरे यांच्या वस्तीजवळ गेल्या चार दिवसांपासून बिबट्याने मुक्काम ठोकला आहे. रविवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सुनील घुमरे यांच्या मका पीकात असलेल्या बिबट्यांनी मस्ती सुरु केल्याचे दिसून आले. शेजारील शांताराम घुमरे यांच्या नारळाच्या झाडावर सुरुवातीला एक बिबट्या चढला. थोड्यावेळाने तो बिबट्या खाली उतरला. पुन्हा दुसरा बिबट्या त्याचा पाठलाग करीत आला. तेव्हा पहिला बिबट्या नारळाच्या झाडावर सरसर चढला त्याला पकडण्यासाठी दुसरा बिबट्या नारळाच्या झाडावर सरसर चढला. मस्ती केल्यानंतर दुसरा बिबटया हळूहळू खाली उतरला. आपल्या धारधार नखांनी नारळाची झाडाची घट्ट पकड करीत दोन्ही बिबटे झाडावर चढले आणि पुन्हा अलगत खाली उतरल्याचे घुमरे यांनी त्यांच्या मोबाईल कॅमेºयात शुटींग करुन घेतले.
शेतक-यांची पळता भुई थोडीसिन्नर तालुक्यातील सांगवी येथे नारळाच्या झाडावर मस्ती करणाºया बिबट्यांची शुटींग शेतकºयांनी मोबाईलच्या कॅमेºयात शुटींग केली. मात्र दोन्ही बिबटे खाली उतरल्यानंतर अवघ्या ५० फूट अंतरावर वस्ती असलेल्या सुनील घुमरे यांच्या वस्तीवरील शेतकºयांना पळता भुई थोडी झाली.
कुत्र्यांना बनवले भक्ष्य..गेल्या चार दिवसांपासून घुमरे वस्तीवरील आणि परिसरातील पाळीव कुत्र्यांना या दोन बिबट्यांनी भक्ष्य केल्याचे शेतकºयांनी सांगितले. गेल्या चार दिवसांपासून या परिसरात दोन बिबट्यांचे दर्शन होत आहे. मात्र कुत्र्यांव्यतिरिक्त अजून या बिबट्याने पाळीव गायी-बैल किंवा माणसावर हल्ला केला नसल्याचे शेतकºयांनी सांगितले.
सिन्नर वनविभागाचे पथक घटनास्थळीसांगवी शिवारात दोन बिबटे नारळाच्या झाडावर मस्ती करीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याची खातरजमा करुन सिन्नर वनपरिक्षेत्र कार्यालयाचे रेस्क्यू पथक सांगवी येथे रवाना झाल्याची माहिती सिन्नरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी मनिषा जाधव यांनी ‘लोकमत’ शी बोलतांना दिली. सुनील घुमरे यांच्या मक्याच्या शेतात पिंजरा लावण्यात येणार आहे.