इगतपुरी : इगतपुरी शहरातील जुना मुंबई-आग्रा महामार्गाजवळील पंचायत समितीच्या मागे एकाच रात्री दोन बंगल्यांमध्ये घरफोडी होऊन एक लाख ९३ हजार रुपयांचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. इगतपुरी शहरातील गिरणारे येथील शिक्षक कॉलनीतील अनिल वामन धवसे व अविनाश कुलकर्णी यांच्या बंगल्यामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराचे शटर व कुलूप कोयंडा तोडून एक लाख ९३ हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. अविनाश कुलकर्णी यांच्या घरातून एक टीव्ही, सोन्याची पोत, चांदीचे ताट, चांदीच्या घरगुती वस्तू असा ऐवज चोरून नेला असल्याची फिर्याद इगतपुरी पोलीस ठाण्यात केली आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक संदीप आटोळे यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. नाशिक येथील श्वान पथक आणि अंगुलीमुद्रा यांच्या अधिकाऱ्यांनी सदर दोन्ही बंगल्यात अनोळखी माणसाचे हाताचे ठसे घेतले आहे. याच परिसरात मागील तीन महिन्यांपूर्वीही सोनार कॉम्प्लेक्समधील तीन दुकानांची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली होती. त्यामुळे परिसरात रात्रीची पोलीस गस्त वाढविण्याची मागणी येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे.या चोरीच्या घरफोडीचा तपास इगतपुरी पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार पठाण, अशोक खंडरे, हवालदार कैलास जाधव, मधुकर पवार, हेमंत मेढे, संदीप हांडगे, सलमान इनामदार, रामदास गांगुर्डे आदि करीत आहेत.
इगतपुरीत दोन घरफोडीत दोन लाखांचा ऐवज लंपास
By admin | Published: June 18, 2014 1:01 AM