लोकमत न्यूज नेटवर्कंमालेगाव : येथून जनावरांची कत्तल करून मुंबईकडे चार हजार १६० किलो जनावरांचे मांसाची वाहतूक करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना मिळालेल्या माहितीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी अजित हगवणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी भूषण खैरनार, संदीप गुरव, हरिष कोळी, दीपक वानखेडे यांनी टेहरे शिवारात सापळा लावला. दरम्यान, बाबू मुंडी, रा. अय्युबनगर, मेनरोड चौक, मालेगाव हा फरार झाला असून, त्याचा शोध घेत आहेत. एकाचा शोध सुरूमुंबई - आग्रा महामार्गावरील भरत पेट्रोलपंपासमोरील गतिरोधकावर पिकअप वाहनातून (क्र. एमएच ४१ एजी २२१६) पाच लाख ४० हजार रुपये किमतीचे चार हजार १६० किलो वजनाचे जनावराचे मांस मालेगाव येथून मुंबईकडे वाहतूक करताना शेख कुतुबुद्दीन शेख जैनुद्दीन (३०) रा. हिरापूर, हायफाय हॉटेल, मालेगाव व वाहनासोबत असलेला अतिक अहमद मोहंमद रफीक (३४) रा. आखरी गल्ली, सरकारनगर, मालेगाव यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून पिकअप वाहनासह आठ लाख ५२ हजार २८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मांस वाहतूक करणाऱ्या दोघांना मालेगावी अटक
By admin | Published: July 06, 2017 12:22 AM