नाशिक : गंगापूर धरण परिसरामध्ये फिरण्यासाठी गेलेल्या सहा ते सात मित्रांच्या ग्रुपमधील दोन अल्पवयीन मित्रांचा जलाशयात सोमवारी (दि.5) संध्याकाळी बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेने जुने नाशिकमधील खडकाळी भागात शोककळा पसरली आहे.शाळांना सुटी असल्याने सोमवारी सकाळी जुन्या नाशकातील सहा ते सात मुलांचा ग्रुप दुचाकींवरून भटकंतीकरिता बाहेर पडला. सावरगावमार्गे हे सगळे मित्र गंगापूर धरणावर पोहचले. संध्याकाळी सुर्यास्त बघून घरी परतण्याचा बेत आखलेला असताना फोटोसेशन करताना कैफ उमर शेख (16), साबीर सलीम शेख (15, दोघे रा.खडकाली, त्र्यंबक पोलीस चौकीमागे) हे अचानकपणे जलाशयात कोसळले. एकमेकांना वाचविण्यासाठी दोघांनी प्रयत्न केला मात्र पोहता येत नसल्याने पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही गटांगळ्या खाऊ लागले. यावेळी त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांच्यासोबत आलेले अन्य मित्रदेखील धावले मात्र तोपर्यंत दोघेही पाण्यात बुडालेले होते. मित्रांनी आजूबाजूला धाव घेत स्थानिक युवक नागरिकांना सांगून मदतीला बोलावले. काही स्थानिक जलतरणपटूंनी पाण्यात सूर लगावत दोघांना बाहेर काढण्यासाठी शोध सुरु केला. सुमारे अर्ध्या तासानंतर कैफ आणि साबीर यांचे मृतदेह हाती आले. त्यांच्या मृत्युने जुने नाशिक परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
धरणावर फोटो काढणं पडलं महागात; बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 20:46 IST
Drowning Case : या दुर्घटनेने जुने नाशिकमधील खडकाळी भागात शोककळा पसरली आहे.
धरणावर फोटो काढणं पडलं महागात; बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
ठळक मुद्देकैफ उमर शेख (16), साबीर सलीम शेख (15, दोघे रा.खडकाली, त्र्यंबक पोलीस चौकीमागे) हे अचानकपणे जलाशयात कोसळले.