नाशिक : लॉकडाऊनचा फायदा घेत मार्च ते ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान पेठरोडवरील एका हॉटेलचा पत्रा उचकटून हॉटेलमध्ये ठेवलेले प्रिंटर, संगणक, धातूची भांडी, तसेच सीसीटीव्ही कॅमेरे असा ४६ हजार रुपयांचा ऐवज चोरी करणाऱ्या नेणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले विरगाव येथून चौघा संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याडूकन चोरी केलेले धातूची भांडी हस्तगत करण्यात आली आहेत. त्यापैकी दोघे अल्पवयीन असल्याचे तपासात पुढे आले आहेत.या चोरी प्रकरणी हॉटेल महाराष्ट्र दरबारचे व्यवस्थापक अशरफ नजीर मणियार यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पेठरोडवर असलेल्या हॉटेलात संशयित राहुल संजय तुरे हा वेटर म्हणून कामाला होता. कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्याने शासनाने गेल्या मार्च महिन्यात लॉकडाऊन केले होते. त्यामुळे हॉटेल ऑगस्ट महिन्यापर्यंत बंद होते. दरम्यान याच कालावधीत संशयित तुरे याने त्याचा साथीदार शिवा राजू उफाडे तसेच अन्य दोघा अल्पवयीन बालकांच्या मदतीने हॉटेलचा पत्रा उचकावून प्रवेश करत धातूची पातेले संगणक, प्रिंटर, सीसीटीव्ही कॅमेरे असा ऐवज चोरुन नेला होता. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक भगत यांनी स्थानिक गुन्हे शोधपथकाला या गुन्हाच्या छडा लावण्याचे आदेश दिले होते.संशयिताच्या आईचा मोबाईल क्रमांक मिळाला त्या नुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तांत्रिक विश्लेषण करत संशयिताला नगर जिल्ह्यातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याने विधीसंघर्षित बालकांच्या मदतीने हॉटेलमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पथकातील बाळनाथ ठाकरे, विजय मिसाळ, सागर कुलकर्णी, आनंद चौधरी, किरण सानप, राकेश शिंदे, विलास चारोस्कर आदींनी सापळा रचून त्याच्या दुसऱ्या साथीदारालाही हुडकून काढले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने दोन्ही अल्पवयीन मुलांची माहिती दिली. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
दोघे अल्पवयीन : लॉकडाऊनचा फायदा घेत भांडी पळविणारे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 2:31 PM
नाशिक : लॉकडाऊनचा फायदा घेत मार्च ते ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान पेठरोडवरील एका हॉटेलचा पत्रा उचकटून हॉटेलमध्ये ठेवलेले प्रिंटर, संगणक, धातूची ...
ठळक मुद्देचौघा संशयितांना ताब्यात घेतलेदोघे अल्पवयीन असल्याचे तपासात पुढे आले