लोहोणेर : कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मालेगाव येथील सामान्य रु ग्णालयात लॅब टेक्निशिअन म्हणून कार्यरत असलेले व संगमेश्वर भागातील काकूबाईच्या बागेतील स्वयंसेवक प्रथमेश प्रवीण कोटस्थाने यांनी दोन महिने रुग्णसेवा केली. प्रथमेश सुखरूप घरी परतल्यानंतर ग्रामस्थांसह कुटुंबीयांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत औक्षण करून स्वागत केले. दोन महिन्यांपासून कोरोनाच्या महामारीत आपली सेवा बजावत असलेला भाऊ घरी सुखरूप आला याचा मनस्वी आनंद झाल्याची प्रतिक्रिया प्रथमेशची बहीण प्राची कोटस्थाने यांनी दिली.-------------------कोरोनाच्या काळात रु ग्णांना सेवा देणे हे एक मोठे आव्हान होते. मात्र वरिष्ठ अधिकारी व सहकारी यांच्या मार्गदर्शन तसेच कुटुंबातील सदस्य व मित्र परिवार यांच्या आशीर्वादा मुळे हे कार्य करण्यास ऊर्जा मिळाली.-प्रथमेश कोटस्थाने,कोरोना योद्धा-----------------प्रथमेश यांना रुग्णांचे स्वॅब घेण्याची जबाबदारी देण्यात आली होती. अनेक बाधित रुग्णांचे नमुने प्रथमेश यांनी घेतले. यामुळे कोरोनाच्या संसर्गाची भीती अधिक होती.स्वरक्षण आणि सुरक्षितताअसल्याने कुटुंबीयांपासून दोनमहिने ते दूर होते. त्यांचे सुखरूपघरी आगमन होताच त्यांना दीर्घायुष्य मिळावे, असे साकडे आई भगवती चरणी घालण्यात आले.
दोन महिन्यांच्या कोरोनायोद्ध्यांची घरवापसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 9:21 PM