सिडको घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत एप्रिल व २४ मे या काळावधीत सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणेबाबत २५५ केसेस, नियमबाह्य दुकान चालू ठेवलेबाबत २१ केसेस, कचरा वर्गीकरण न केलेबाबत पाच केसस, कचरा वर्गीकरण न करणे तसेच प्लॅस्टिक वापर केल्याबद्दल, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून अस्वछता आदींसह विविध स्वरूपाच्या एकूण २८०हून अधिक कारवाया करीत सुमारे साडेचार लाख रुपये दंड वसूल केला .
चौकट===
गेल्या दोन दिवसांपूर्वी घनकचरा व्यवस्थापन विभाग व पोलीस प्रशासन यांचे संयुक्तपणे सिडको विभागातील अश्विननगर येथे कोणतीही परवानगी न घेता घरगुती विवाह समारंभ चालू असताना सदर विवाहाचे ठिकाणी मास्कचा वापर न केलेबाबत ३० नागरिकांना १५ हजार रुपये तसेच सुरक्षित अंतर
( फिजिकल डिस्टन्सिंग)चे पालन न केलेबाबत वरपक्ष, वधूपक्ष व केटरिंग सर्व्हिसेसच्या मालक यांच्यावर प्रत्येकी पाच हजारांप्रमाणे पंधरा हजार रुपये अशी एकूण तीस हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.