नाशिक : जुने नाशिकमधील जुन्या तांबट गल्लीतील सुमारे पंधरा वाडे धोकादायक झाले असून, या वाड्यांमध्ये राहणारे वाडामालक व त्यांचे भाडेकरू मिळून सुमारे साठ कुटुंबांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केल्याने गल्लीमध्ये सध्या शुकशुकाट पसरला आहे. मंगळवारच्या रात्री कुंभकर्ण व भागवत वाड्याच्या मागील भिंती ढासळल्या. भद्रकाली पोलिसांनी बडी दर्गा-पिंजारघाटकडून गल्लीमध्ये येणारी वाहतूक वळविली आहे.जुन्या तांबट गल्लीत धोकादायक वाड्यांची संख्या अधिक असून, हा परिसर महापालिकेच्या पश्चिम विभागाच्या प्रभाग १३ मध्ये समाविष्ट आहे. गेल्या रविवारी दुपारी या गल्लीत काळेवाडा कोसळून दोघा मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण शहरासह प्रशासनही हादरले. या दुर्घटनेत तीन रहिवासी जखमी झाले आहेत. यानंतर जुने नाशिकमधील धोकादायक वाड्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला. काळेवाडा कोसळला त्यावेळी त्याला लागून असलेला भागवत वाडाही हादरला होता. तसेच त्याचा झटका कुंभकर्ण वाड्यालाही काही प्रमाणात बसला होता. या दोन्ही वाड्यांच्या भिंतींचा काही भाग रात्रीच्या सुमारास ढासळल्याचे परिसरातील रहिवाशांनी सांगितले. वाड्यांच्या भिंती ढासळू लागल्याचे लक्षात आल्यानंतर बुधवारी दिवसभर येथील रहिवाशांची संसारोपयोगी वस्तू हलविण्याची लगबग सुरू होती. संध्याकाळपर्यंत संपूर्ण गल्ली शांत झाल्याचे चित्र होते. जुन्या तांबट गल्लीचा रस्ता खुला करण्यासाठी धोकादायक वाड्यांचा भाग उतरविणे गरजेचे आहे. रहिवाशांनी आयुक्त मुंढे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्थलांतर केले आहे. अग्निशामक दलासह पोलीस सतर्कदोन वाड्यांचा भाग रात्री कोसळल्यानंतर परिसरातील काही रहिवाशांनी सकाळच्या सुमारास शिंगाडा तलाव येथील मुख्यालय गाठून अग्निशामक दलाला पाहणी करण्याची विनंती केली. यावेळी तत्काळ अग्निशामक दलाचे जवान तसेच विभागीय अधिकारी, भद्रकाली पोलिसांनी जुन्या तांबट गल्लीत जाऊन पाहणी केली. रहिवाशांनी दोन वाड्यांचा भाग समोरील बाजूनेही कलला असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर या गल्लीतील वाहतूक पोलिसांनी बॅरिकेड्स लावून बंद केली. अग्निशामक दलाचा बंब रात्रभर गल्लीत थांबलेला होता.या रहिवाशांचे स्थलांतरदुर्घटनाग्रस्त वाड्यांमधील कुटुंबीयांसह राहुल चुंबळे, सतीश कुंभकर्ण, अजय गायकवाड, बंडोपंत विंचूरकर, दीपक भागवत, नंदू काळे, अमेय कुंभकर्ण, रमेश भतीजा, उमेश जगदाणी आदींनी आपल्या कुटुंबासह जुन्या तांबट गल्लीतील वाड्यांमधून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे.
आणखी दोन वाड्यांच्या भिंती कोसळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 1:24 AM
नाशिक : जुने नाशिकमधील जुन्या तांबट गल्लीतील सुमारे पंधरा वाडे धोकादायक झाले असून, या वाड्यांमध्ये राहणारे वाडामालक व त्यांचे भाडेकरू मिळून सुमारे साठ कुटुंबांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केल्याने गल्लीमध्ये सध्या शुकशुकाट पसरला आहे. मंगळवारच्या रात्री कुंभकर्ण व भागवत वाड्याच्या मागील भिंती ढासळल्या. भद्रकाली पोलिसांनी बडी दर्गा-पिंजारघाटकडून गल्लीमध्ये येणारी वाहतूक वळविली आहे.
ठळक मुद्देजुनी तांबट गल्ली : साठ कुटुंबांचे स्थलांतर; पंधरा वाडे अजूनही धोकादायक