त्यामुळे येत्या सहा महिन्यात अनेक चांगले प्रकल्प पूर्ण झालेले
नाशिककरांना दिसतील. गावठाण विकास प्रकल्पांतील कामे चांगली आहेत.
यासंदर्भात नगरसेवकांना विश्वासात घेऊन आणि महापालिकेच्या समन्वयानेच ती
करण्यात येणार आहेत.
नाशिकच्या स्मार्ट सिटी कंपनीची सूत्रे घेतल्यानंतर मी स्वत:
महापालिकेतील अनेक पदाधिकारी आणि नगरसेवकांना भेटून त्यांच्या अपेक्षा
जाणून घेतल्या आहेत. स्मार्ट सिटीची कामे संथगतीने होत आहेत, त्यांची
गती वाढवली पाहिजे, अशीही अपेक्षा आहे. त्यानुसार नियोजन केले आहे. गेल्या
वर्षभर कोरोनामुळे अनेक अडचणी आल्या. मजूर उपलब्ध होत नव्हते तसेच अन्यही
अडचणी होत्या. मात्र, आता अडचणी त्या दूर हाेत आहेत. त्यामुळे कामाला गती मिळेल.
स्मार्ट सिटीच्या वेगवेगळ्या कामांचे नियोजन करताना समन्वयावर भर देणार
आहे. गावठाणातील रस्ते आणि अन्य विकासाबाबत स्थानिक नगरसेवकांशी संपर्क
साधून त्यांना विश्वासात घेण्यात येईल. त्यांच्या संमतीनेच कामे करण्यात
येतील. स्मार्ट सिटीकडून कामे वेगाने पूर्ण होतील. नंतर मात्र कामे
केव्हा होऊ शकतील, हे सांगता येत नाही. मुळातच गावठाण भागात काम करणे खूपच
आव्हानात्मक आहे. त्यामुळे आता रस्ते, पाणी पुरवठ्याची कामे वेळेत पूर्ण
होणे आवश्यक आहे.
येत्या सहा महिन्यात आणखी काही कामे नव्याने सुरू करण्यात येणार आहेत.
स्काडा मीटरसाठी निविदा काढण्यात येणार आहे. औद्योगिक आणि व्यावसायिक
ग्राहकांना मीटर बसवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे मखलमलाबाद येथील
हरित क्षेत्र विकास प्रकल्प शासनाकडे प्रलंबित आहे. त्याबाबत निर्णय
घेण्यात येईल तसेच शहराची गरज लक्षात घेता दोन बहुमजली वाहनतळ
साकारण्याचा प्रस्ताव आहे. स्मार्ट पार्किंग लवकरच कार्यान्वित
करण्यात येणार आहे. सीसीटीव्ही बसवण्याच्या कामालादेखील वेग देण्यात
आला असून, पन्नास कॅमेरे बसवण्यात आले आहेत. ही सर्व कामे वेळेत पूर्ण
झाल्यास शहरवासियांना दिलासा मिळू शकेल.
- सुमंत मोरे, सीईओ, स्मार्ट सिटी
280721\28nsk_1_28072021_13.jpg
सुमंत मोरे, सीईओ, स्मार्ट सिटी