शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

दरोड्याच्या तयारीतील दोघे जाळ्यात

By admin | Published: November 06, 2015 11:46 PM

दरोड्याच्या तयारीतील दोघे जाळ्यात

सिडको : येथील सूर्योदय कॉलनीत रहिवाशी राजकुमार बाफणा यांच्या घरात वीस लाख रुपयांची रोकड असल्याची टिप चोरट्यांना देऊन यातून सख्ख्या काकालाच गंडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या मास्टर माइंडसह दोघा चोरट्यांना अंबड पोलीस ठाण्याच्या बीट मार्शलने पाठलाग करुन पकडले. सिडकोतील सावतानगर भागातील सूर्योदय कॉलनीत राजकुमार बाफणा हे कुटुंबीयांसमवेत राहतात. गेल्या गुरुवारी (दि. ५) रोजी ते कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. यावेळी त्यांच्या घरी पत्नी, मुलगा व मुलगी सिद्धी होते. त्यांच्या घरी राजकुमार यांच्या सख्ख्या भावाचा मुलगा पंकज कायम ये-जा कारीत असे. गेल्या काही दिवसांपासून पंकज हा जुगार तसेच व्यसनाधीन झाला असून, यात तो कर्जबाजारीही झाला. यामुळे त्यास पैशाची गरज भासू लागली. आपले काका हे सरकारी ठेकेदार असल्याने पंकजने काकांच्याच पैशावर डल्ला मारण्याची तयारी केली. यासाठी त्याने काका गावाला गेल्याची संधी साधली. पंकजने काका गावाला गेल्यावर सायंकाळी त्यांच्या घरी आला व काकांच्या मुलास बरोबर घेऊन गेला. यानंतर घरात राजकुमार यांच्या पत्नी व अकरा वर्षाची मुलगी सिध्दी होती. पंकजने याचा फायदा घेत दोन चोरट्यांना हाताशी धरत चोरी करण्याची तयारी केली. यात पंकजने काका गावाला गेल्याने त्यांच्या घरातील रोकड लंपास करण्यासाठी दोघा चोरट्यांनाच हाताशी धरले. या चोरट्यांनी गेल्या गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास राजकुमार बाफणा यांच्या घरात घुसले. त्यांनी घरात असलेल्या आरती बाफणा यांना चाकूचा धाक दाखविला व त्यांना दोरीने बांधून ठेवले. यानंतर त्यांनी घरातील वीस लाख रुपयांची रोकड शोधऱ्याचा प्रयत्न केला. परंतु याच दरम्यान त्यांची मुलगी घराबाहेर खेळत होती ती घरात येण्यासाठी दरवाजा वाजवला. यामुळे चोरट्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात गर्दी झाली याच दरम्यान या भागात पेट्रोलिंग करीत असलेले अंबड पोलीस ठाण्याचे बीट मार्शल विष्णू दामू गावित व राजाराम तुळशीराम गांगुर्डे यांना या घटनेची माहिती मिळाली त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पलायन करीत असलेल्या दोघा चोरट्यांना पाठलाग करुन पकडले. यांची चौकशी केली असता अक्षय देशमुख (रा. लासलगाव) व दुसरा राहुल चौधरी (रा. जळगाव) अशी त्यांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघा चोरट्यांना घरात फक्त सह हजार रुपयांची रोकड मिळाली. या दोघा चोरट्यांनीच माहिती देताना सांगितले की, बाफणा यांच्याच पुतण्याने चोरी करण्यास सांगितल्याचे स्पष्ट केले. यावरून दोघा चोरट्यांसह पंकज यास अटक केल्याची माहिती पोलीस उपआयुक्त श्रीकांत धिवरे यांनी दिली.पुतण्याने केला घात

  • राजकुमार बाफणा यांचा पुतण्यानेच घात करण्याचा प्रयत्न केला. पुतण्या पंकज बाफणा हा नियमित काकाच्या घरी येत असे. पुतण्या पंकज असे काही कृत्य करेन, अशी यात किं चितही माहिती राजकुमार बाफणा यांना नव्हती; परंतु गेल्या काही दिवसांपासून पंकज हा जुगार व व्यसनाधीन झाल्याने कर्जबाजारी झाला होता. यातून त्याने हे कृत्य केल्याचे पोलीस उपायुक्तश्रीकांत धिवरे यांनी सांगितले.
  • अंबड पोलीस ठाण्याचे बीट मार्शल विष्णू गावित व राजाराम गांगुर्डे यांनी दाखविलेल्या धाडसामुळेच गुन्हा घडण्याआधीच उघडकीस आला. अक्षय देशमुख व राहुल चौधरी हे दोघे चोरटे पलायन करीत असतानाच दोघे बीट मार्शल पोलीस कर्मचाऱ्यांनी चोरट्यांचा धाडसाने पाठलाग करून त्यांना पकडले. या दोघा बीट मार्शलचा पोलीस उपायुक्त यांनी सत्कार केला.