लोकमत न्यूज नेटवर्कतळेगावरोही : चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही मध्ये दोन अहवाल पॉझिटिव्ह रु ग्ण आढळले आहे.तरी सर्व ग्रामस्थांनी कोरोना या प्राण घातक विषाणू पासुन बचाव करण्यासाठी कोणीही गावामध्ये गर्दी करू नये. तसेच एकमेकांच्या संपर्कात येऊ नये. तसेच तळेगाव रोही परिसर सील करण्यात आला असून वैद्यकीय अधिकारी, सरपंच पोलीस पाटील, ग्रामरक्षक दल पूर्ण पणे दखल घेत असल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज ठाकरे यांनी दिली. सर्वानी घरी थांबु या आणि कोरोना वर विजय मिळु या. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात रुग्णवाढीचे प्रमाण वाढल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, गर्दीत जाऊ नये, तोंडाला नेहमी मास्क लावावे, हात सतत धूत राहावे, सॅनिटायझरचा नियमित वापर करावा, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
तळेगावरोही येथे दोन रुग्ण कोरोनाबाधीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2020 8:15 PM
लोकमत न्यूज नेटवर्क तळेगावरोही : चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही मध्ये दोन अहवाल पॉझिटिव्ह रु ग्ण आढळले आहे.तरी सर्व ग्रामस्थांनी कोरोना या प्राण घातक विषाणू पासुन बचाव करण्यासाठी कोणीही गावामध्ये गर्दी करू नये. तसेच एकमेकांच्या संपर्कात येऊ नये. तसेच तळेगाव रोही परिसर सील करण्यात आला
ठळक मुद्देतोंडाला नेहमी मास्क लावावे, हात सतत धूत राहावे, सॅनिटायझरचा नियमित वापर करावा, असे आवाहन