सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील सांगवी शिवारात ऊसतोडणी करतांना मजूरांना ऊसाच्या शेतात चार बछडे आढळून आले. दोन बछडे ऊसाच्या शेतात निघून गेले असून मजूरांना मिळालेले दोन बछडे वनविभागाने ताब्यात घेऊन मादीच्या प्रतीक्षेत ऊसाच्या शेताच्या कडेला कॅरेटमध्ये ठेवले आहेत. वनविभागाने मादीला जेरबंद करण्याऐवजी तीने बछड्यांना घेऊन जावे अशी अपेक्षा बाळगली आहे.सांगवी शिवारात शरद मल्हारी घुमरे यांची धनगरवाडी रस्त्याच्या कडेला कालव्यालगत शेतजमिन आहे. घुमरे यांनी सात एकर ऊस केला असून त्याची तोड सुरु आहे. शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास मजूरांना ऊसतोड करीत असतांना चार बछडे दिसून आले. त्यातील दोन बछडे बाहेर आले तर दोन बछडे ऊसाच्या शेतात निघून गेले. मजूरांनी तातडीने घटनेची माहिती घुमरे यांना दिली. घुमरे यांनी वनविभागासोबत संपर्क साधून बछडे आढळल्याचे सांगितले.सिन्नर मंडळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनकर्मचारी शरद थोरात यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जावून दोन बछड्यांना ताब्यात घेतले. मात्र बछड्यांना तेथून हलविल्यानंतर मादी उग्र रुप धारण करेल यामुळे सापडलेल्या दोन बछड्यांना ऊसाच्या कडेलाच एका कॅरेटमध्ये ठेवण्याचा निर्णय वनविभागाने घेतला.दोन बछड्यांना ऊसाच्या कडेला कॅरेटमध्ये ठेवण्यात आले आहे. सायंकाळी अंधार पडल्यानंतर मादी बछड्यांना घेऊन जाईल अशी अपेक्षा वनविभागाने बाळगली आहे. सदर बछडे अंदाजे पंधरा दिवसांची असल्याची शक्यता वनविभागाने व्यक्त केली आहे.दरम्यान, ऊसतोड मजूरांनी बिबट्या मादीच्या धास्तीने ऊसतोड बंद केली आहे. बिबट्याची चार बछडे असल्याने मादी रात्री आक्रमक होण्याच्या धास्तीने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. मादीला पिंजºयात जेरबंद करण्याऐवजी तीने बछड्यांना घेऊन जावे अशी वनविभागाची भूमिका आहे.
ऊसाच्या शेतात आढळली बिबट्याची दोन बछडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 6:03 PM
सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील सांगवी शिवारात ऊसतोडणी करतांना मजूरांना ऊसाच्या शेतात चार बछडे आढळून आले. दोन बछडे ऊसाच्या शेतात निघून गेले असून मजूरांना मिळालेले दोन बछडे वनविभागाने ताब्यात घेऊन मादीच्या प्रतीक्षेत ऊसाच्या शेताच्या कडेला कॅरेटमध्ये ठेवले आहेत. वनविभागाने मादीला जेरबंद करण्याऐवजी तीने बछड्यांना घेऊन जावे अशी अपेक्षा बाळगली आहे.
ठळक मुद्देसांगवी : आणखी दोन बछडे ऊसात असल्याने घबराहट