शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

इमारतीचा जिना कोसळून दोघे जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 4:37 PM

नाशिक शहरातील मालवीय चौक परिसरात असलेल्या सुकेणकर लेन येथे एका जुन्या इमारतीचा तिसऱ्या मजल्यावरील जिना कोसळून झालेल्या घटनेत दोघेजण खाली पडल्याने जखमी झाले आहे. शुक्रवारी (दि.5) दुपारी एक वाजता घटना घडली. या घटनेतील जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर पंचवटी महापालिका विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांच्यासह संबंधित विभागाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.

ठळक मुद्देनाशकात जुन्या इमारतीचा जीना कोसळून अपघातपावसामुळे झालेल्या अपघातात महिलेसह दोन जखमी सुकेणकर लेनमधील श्रीराम अपार्टमे येथील घटना

नाशिक : शहरातील मालवीय चौक परिसरात असलेल्या सुकेणकर लेन येथे एका जुन्या इमारतीचा तिसऱ्या मजल्यावरील जिना कोसळून झालेल्या घटनेत दोघेजण खाली पडल्याने जखमी झाले आहे. शुक्रवारी (दि.5) दुपारी एक वाजता घटना घडली. या घटनेतील जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर पंचवटी महापालिका विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांच्यासह संबंधित विभागाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.या घटनेत सरिता जैन (50), व धीरज लालवाणी (30) असे दोघे जण जखमी झाले आहे. सदरची इमारत सुमारे 35 ते 40 वर्षांपूर्वी असल्याने त्यातच इमारतीचा जिना जीर्ण झाल्याने कोसळल्याची घटना घडल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले. जिना कोसळल्याच्या घटनेनंतर पंचवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत इमारतीत राहणाऱ्या अन्य नागरिकांना सुरक्षित स्थळी बाहेर काढणयाचे काम केले. सुकेणकर लेन परिसरात श्रीराम अपार्टमेंट आहे या अपार्टमेंटमध्ये दहा ते बारा सदस्य राहत असून इमारत जुनी झाल्याने इमारतींचे जीनेही जीर्ण झालेले आहेत.यातील एक शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमाराला पाऊस सुरू असताना कोसळला. इमारतीत राहणाऱ्या सविता जैन  या कपडे सुकविण्यासाठी जात असताना अचानक जिना कोसळला त्यावेळी जिन्यात उभा असलेला धीरज ललवाणी हा देखील जिन्यासह खाली पडला. या घटनेत जैन व ललवाणी हे दोघेही जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.दरमम्यान, इमारतीतील नागरिकांना सुरक्षिततेचा उपाय म्हणून बाहेर काढण्यात आले असून ज्या नागरिकांची राहायची व्यवस्था नाही त्यांना तात्पुरती महापालिका प्रशासनाकडून व्यवस्था करून दिली जाणार असल्याचे विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांनी सांगितले. ज्या इमारतीत दुर्घटना घडली त्या इमारतीचा भाग धोकेदायक झाल्याने महापालिका प्रशासनाच्या वतीने काही दिवसांपूर्वीच नोटीस बजावल्याचेही यावेली प्रशासनाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिकBuilding Collapseइमारत दुर्घटनाNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका