वणी : वणी - दिंडोरी रस्त्यावर लखमापूर फाटा परिसरातील हॉटेल स्वामीजवळ ट्रक व दुचाकीचा समोरासमोर अपघात होऊन दुचाकीस्वार दोघे जागीच ठार झाले तर एका जखमीवर दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुभाष सुरेश गांगुर्डे (३२, रा. पुणेगाव) व संदीप प्रकाश तेजाळे (रा. अवनखेड) व त्यांचा मित्र असे तिघे दुचाकी व समोरून येणारी ट्रकयांच्यात अपघात झाला. या भीषण अपघातात सुभाष गांगुर्डे व संदीप तेजाळे जागीच ठार झाले आहेत, तर दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात या अपघातात जखमी झालेल्या युवकावर उपचार सुरू आहेत. (वार्ताहर)
अवनखेडचे दोघे अपघातात ठार
By admin | Published: April 22, 2017 1:29 AM