नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला फाटा येथे कंटेनर व आयशर या दोन वाहनांदरम्यान झालेल्या अपघातात एक जण गंभीर तर एक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना शुक्र वारी (दि.३) रोजी पहाटे घडली आहे.नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला फाटा येथे नाशिकहून - मुंबईकडे भरधाव वेगाने जात असतांना कंटेनर क्र मांक (एम.एच.०६, ए.क्यू. ८५८३,) या गाडीच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे सदर कंटेनरने दूभाजक तोडून मुंबईहून नाशिककडे येणाऱ्या आयशरला जोरदार धडक दिली. आयशर क्र मांक (एम.एच. ३२, क्यू ५६१६) जागेवरच उलटी झाल्यामुळे या झालेल्या अपघातात रोशन बाबाराव चलाख (३०), सुरज बाबाराव चलाख (२१, दोघेही राहणार, वडगाव खुर्द ता. सेलु जि.वर्धा) यामध्ये दोघे भाऊ जखमी झाले आहेत. दरम्यान अपघाताची माहिती गस्त घालत असलेल्या वाहतूक पोलिसांना कळताच त्यांनी सदर अपघाताची माहिती वाडिव-हे पोलिस स्टेशनला कळवली. तसेच राञी १.३० वाजता झालेल्या या अपघाताची माहिती पोलिसउप अधीक्षक अरु ंधती राणे यांना समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करण्यास सांगितला. यानंतर अपघाताची माहिती मिळताच वाडीव-हे पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विश्विजत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी परदेशी, जाधव, आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करण्यात आला. पुढील तपास वाडिव-हे पोलिस पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी करीत आहेत.
आयशर उलटून अपघातात दोन जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 1:11 PM