नाशिक: मद्यधुंद पोलिस शिपायांनी स्वत:च्या कारने रस्त्यावरील दुसऱ्या एका मोटारीला जोरदार धडक देत त्या वाहनमालकासह नागरिकांना शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि.५) लेखानगर भागात घडली होती, यावेळी संशयित पोलीसाने आपल्या दुसऱ्या पोलीस भावाला लेखानगरला बोलावून घेत जाब विचारनाऱ्या वाहनमालकासह मध्यस्थी करनाऱ्या युवकाला युवकाला बेदम मारहाण केली होती, या घटनेची पोलीस आयुक विश्वास नांगरे पाटील यांनी गंभीर दखल घेत दोघा पोलीस भावंडाचे निलंबनाची कारवाई केल्याची माहिती उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी दिली. सागर अमरसिंग हजारे (३२) मयुर अमरसिंग हजारे (३१) असे निलंबीत केलेल्या पोलिसांचे नावे आहे. याप्रकरणी सागर सुर्यभान जाधव यांनी अंबड पोलीस ठाण्यात दोघा संशयित पोलिसाविरोधात तक्रार दिली होती. सध्या सर्वत्र कोरोनाचा कहर सुरु असल्याने लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. अशा संकटकालीन परिस्थितीचा सामना करताना पोलीस दलावर प्रचंड ताण असून पोलीस आपला जीव धोक्यात घालून 'खाकी'ची शान वाढवीत आहे मात्र याचा कुठल्याही प्रकारे जाणीव न ठेवता या दोघा पोलीस बंधूनी जनसामान्यांमध्ये पोलीस दलाची प्रतिमा मालिन करणारे कृत्य केल्यामुळे त्यांना नांगरे पाटील यांनी तात्काळ निलंबित केले आहे. संशयित सागर हजारे याने (एमएच १८ डब्ल्यु ३७५६) या त्याच्या वॅगेनार कारने लेखानगर भागात सुंदरबन कॉलनीमध्ये फिर्यादी जाधव यांच्या वाहनास जोरदार धडक दिली, गाडीला धडक लागल्याचे लक्षत येताच जाधव यांनी व नागरिकांनी संशयित सागर यास गाडीतुन बाहेर काढले, यावेळेस संशयित सागरने त्याचा पोलीस असलेला भाउ मयुर हजारे यास फोन करुन घटनास्थळी बोलावुन घेतले. यावेळी गाडी धडकल्याचा जाब सागर जाधव व अजिक्य चुंबळे यांनी सशयिताला विचारताच हजारे बंधुनी सागर जाधव यांना शिवीगाळ करुन मारहाण केली, तर भांडण सोडविण्यासाठी आलेल्या इरफान शेख या तरुणाला जबर मारहाण केली. सागर हजारे सरकारवाडा तर मयुर हजारे पंचवटी पोलीस ठाण्यात नियुक्त होते. घटनेची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेत दोघा भावंडाचे निलंबन केले.
राडा करणारे दोघे पोलीस बंधू निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2020 8:09 PM
या दोघा पोलीस बंधूनी जनसामान्यांमध्ये पोलीस दलाची प्रतिमा मालिन करणारे कृत्य केल्यामुळे त्यांना नांगरे पाटील यांनी तात्काळ निलंबित केले आहे.
ठळक मुद्दे अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा मद्याच्या नशेत वाहन चालवून दुसऱ्या वाहनाला धडक