लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे मोबाइल चीपच्या माध्यमातून पेट्रोल पंपातूनच इंधनाची चोरी उघडकीस आल्याने देशभर खळबळ माजली असताना याच पद्धतीचा अवलंब करीत पुणे, ठाणे पाठोपाठही अशाच स्वरूपाच्या घटना निदर्शनास आल्या असून, इंधनचोरीच्या संशयावरून दोन दिवसांपूर्वी ठाणे पोलिसांनी महामार्गावरील दोन पंप सील केल्याचे खात्रीशीर वृत्त हाती आले आहे. सदरचा प्रकार पिंपळगाव बसवंत ते चांदवड या दरम्यान घडल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दोन्ही पंप इंडियन आॅइल कार्पोरेशन कंपनीचे असून, शनिवारी ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अचानक या पंपावर छापा मारून पेट्रोल व डिझेलच्या आउटलेटमध्ये बसविण्यात येणारे ‘पल्सर कार्ड’ ताब्यात घेतले. गेल्या आठवड्यात ठाणे पोलिसांनी पेट्रोपंपातूनच इंधनाची चीप बसवून चोरी केली जात असल्याची बाब उघडकीस आणून काही संशयितांना ताब्यात घेतले, त्यांच्या चौकशीतून अशा प्रकारच्या इंधन चोरीसाठी आंतरराज्यीय रॅकेट असल्याचे उघडकीस आले. ठाण्याच्या घटनेपूर्वी काही दिवस आधी पुण्यातही असाच प्रकार घडल्याने या साऱ्या प्रकारावर पोलीस अगोदरपासूनच लक्ष ठेवून असल्याने त्याचा उलगडा झाला. मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंतच्या पुढे असलेल्या दौलत ढाब्यानजीकच्या तसेच चांदवडजवळच्या पेट्रोलपंपावर ही कारवाई करण्यात आली आहे. सदरचे पंप गेल्या दोन दिवसांपासून बंद असून, पोलिसांच्या या कारवाईने इंधनचोरीचे धागेदोरे नाशिक जिल्ह्णापर्यंत येऊन पोहोचल्याचे स्पष्ट झाल्याने पेट्रोलपंप चालकांचे धाबे दणाणले आहे.वजन-माप विभाग संशयातजिल्ह्णातील पेट्रोलपंपातून मोठ्या प्रमाणावर इंधनाची चोरी केली जात असताना पेट्रोलपंपाची नियमित तपासणी करण्याची जबाबदारी असलेले वजनमाप विभागाच्या कार्यक्षमतेवर शंका घेण्यात येत आहे. ठाणे पोलिसांनी थेट कारवाई करून सदरची बाब उघडकीस आणली असल्याने वजनमाप विभाग आता तरी पंपांची तपासणी करतील काय, असा सवाल केला जात आहे.
पेट्रोलचोरीच्या संशयाने दोन पंप सील
By admin | Published: June 20, 2017 12:24 AM