लोकमत न्युज नेटवर्कयेवला : तालुक्यातील कोरोना बाधितांच्या संपर्कातील १० संशयितांची आरोग्य यंत्रणेने रॅपिड अँटीजेन टेस्ट घेतली असता त्यात ८ अहवाल निगेटिव्ह तर २ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.शहरातील मोरेवस्ती येथील ४७ वर्षीय महिलेचा व तालुक्यातील कुसुर येथील ४८ वर्षीय पुरु षाचा रॅपिड अँटीजेन टेस्ट अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या २५८ झाली असून आजपर्यंत २२९ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तर आत्तापर्यंत १९ बाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला बाधित अॅक्टीव्ह रूग्ण संख्या १० असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड यांनी दिली.कोरोना बाधीत १० पैकी नाशिक येथील रु ग्णालयात ५ तर नगरसुल येथील डेडीकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर येथे ५ रूग्णांवर औषधोपचार सुरू आहेत.
येवल्यातील दोन अहवाल पॉझीटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 7:21 PM
येवला : तालुक्यातील कोरोना बाधितांच्या संपर्कातील १० संशयितांची आरोग्य यंत्रणेने रॅपिड अँटीजेन टेस्ट घेतली असता त्यात ८ अहवाल निगेटिव्ह तर २ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
ठळक मुद्देरॅपिड अँटीजेन टेस्ट अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.