नाशिक : दुचाकीवरून पाठलाग करत दोघांनी चाकूचा धाक दाखवून दुचाकीस्वारांना लुटल्याची घटना भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत रविवारी (दि.१९) पहाटेच्या सुमारास घडली. या गुन्ह्यातील संशयित लुटारूंचा अवघ्या बारा तासातशोध घेत पोलिसांनी बेड्या ठोकल्या.भद्रकाली पोलिसांच्या हद्दीत द्वारकेजवळ फिर्यादी गौरव बाळासाहेब परदेशी व त्यांचा मित्र मोहसीन सय्यद हे दुचाकीने (एमएच १५ जीयू ६२१५) पोहोचले असता तेथे त्यांचा पाठलाग करत अॅक्टिवावरून (एमएच १५ एफबी ६८३८) दोघा अज्ञात लुटारुंनी येत त्यांना चाकूचा धाक दाखवून बळजबरीने रोखून धरले.यावेळी त्यांनी मोहसीनला खाली ओढत फोनवर ‘कोणाला तरी बकरा मिळाला टाकू का मारून’ असे विचारले व त्यानंतर दम भरल्याचे गौरवने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्याच्याजवळील मोबाइल व तीन हजारांची रोकड हिसकावून या दोघांनी दुचाकीवरून पोबारा केला. यानंतर दोघा मित्रांनी भद्रकाली पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगत तक्र ार दिली.कसून चौकशीपोलिसांनी तत्काळ दोघा अज्ञात लुटारुंविरुद्ध जबरी लुटीचा गुन्हा दाखल करत दुचाकीच्या क्र मांकावरून सहायक निरीक्षक डी. डी. इंगोले यांच्या पथकाने शोध घेत शंकर सतीश रिडलॉन (रा.महालक्ष्मी चाळ, बागवानपुरा), नितीन किरण पवार (रा.बजरंगवाडी) या दोघा संशयितांना रविवारी दुपारी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी करण्यात आली असून, सोमवारी संबंधितांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
बारा तासात ठोकल्या दोघा लुटारूंना बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 1:16 AM