येवला : तालुक्यातील खरवंडी येथे ग्रामपंचायतीच्या नळाच्या पाण्यावरून झालेल्या किरकोळ भांडणातून जमावाने केलेल्या हल्यात बाळू भिवसन आहेर व रवींद्र भिवसन आहेर हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी बाळू भिवसन आहेर यांची डोक्याला दुखापत झाल्याने प्रकृती चिंताजनक आहे. काही ग्रामस्थांनी मध्यस्थी करून भांडण मिटवले देखील.पण त्यांनतर काही वेळाने मोठा जमावाने केलेल्या हल्यात बाळू भिवसन आहेर (४५) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नाशिक येथील जिल्हा सरकारी रूग्णालयात उपचार सूरु आहेत. बाळू आहेर यांच्या डोक्यावर, हाता पायाने घातक शस्त्रांनी वार झाल्याने रु ग्णाची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी आंनदा भीमराव अहिरे, धर्मा भीमराव अहिरे, प्रकाश भीमराव अहिरे, रामभाऊ बाबूहरी अहिरे, कल्याबाई भीमराव अहिरे, मनीषा आनंदा अहिरे आदींसह इतरांवर गुन्हे दाखल झाले आहेत. रविंद्र भिवसन आहेर यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भापकर यांच्या देखरेखीखाली पोलीस उपनिरीक्षक तांदळकर तपास करत आहेत. पोलीस तपास पथकाने घटनास्थळावरून मोबाईल टॉवर उभारण्याच्या कामात वापरले जाणारे लोखंडी सळया , रॉड सह घातक वस्तू जप्त केल्या आहेत.दरम्यान संशयित फरार झाले असून त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक प्रयत्न करत आहेत.
येवला तालुक्यात प्राणघातक हल्यात दोघे गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 12:55 PM