पेठ (रामदास शिंदे) : शहरासह तालुक्यात अद्याप कोरोना संशयित अथवा पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आला नसला तरी कोरोनाचा ग्रामीण भागात होणारा शिरकाव लक्षात घेऊन दोन ठिकाणी निवारा कक्ष तयार करण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक भौतिक सुविधा व प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याचे तहसीलदार संदीप भोसले यांनी सांगितले.शासकीय आश्रमशाळा इनामबारी येथील वसतिगृह ताब्यात घेण्यात आले असून, या ठिकाणी सद्य:स्थितीत एकही संशयित अथवा नागरिक क्वॉरण्टाइन करण्यात आलेला नाही. वीज, पाणीसह अन्य सुविधा तैनात ठेवण्यात आल्या आहेत. निवारा कक्षासाठी स्वतंंत्र नोडल आॅफिसरची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच आवश्यक कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार संदीप भोसले, वैद्यकीय अधिकारी डॉ. मोतीलाल पाटील, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, सरोज जगताप परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
पेठ तालुक्यात दोन निवारा कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2020 9:20 PM