सिडकोतील सावता नगर येथे बुधवारी (दि २०) स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सभागृहात झालेली बैठक समता परिषदेचे शहराध्यक्ष संतोष सोनपसारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत अध्यक्षपदी पवन मटाले तसेच महिला अध्यक्षपदी हर्षदा सोनवणे यांची निवड करण्यात आली. तर कार्यकारिणीत कार्याध्यक्षपदी शिवाजी बरके, निलेश साळुंके, उपाध्यक्षपदी- सुयश पाटील, प्रतीक तिवारी,रवींद्र दातीर, युवराज दराडे, हर्षद निकम, अरुण निकम, शरद खुटवड, दीपक भोगे, आकाश कदम, रोशन जाधव, देवेंद्र देशपांडे, चिटणीसपदी- मच्छिंद्र पांगरे, नितीन अमृतकर, मनोज सावंत, रवींद्र शिंदे, महेश चंद्रे यांची निवड करण्यात आली. सरचिटणीसपदी - शरद काळे, गौतम पराडे, पिंटू काळे, ललित वाघ, हर्षल चव्हाण, प्रसाद ढेमसे, इम्रान अन्सारी, मॉन्टी दळवी, प्रसिध्दी प्रमुखपदी - नाना ठोंबरे तसेच महिला कार्याध्यक्षपदी वंदना पाटील, सरचिटणीसपदी मनीषा हिरे, खजिनदारपदी रोहित जगताप यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
चौकट
दुसऱ्या गटाचीही बैठक
दरम्यान, दुसऱ्या बैठकीत सर्वपक्षीय युवक व जेष्ठ पदाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सींग बैठक होऊन सिडको उत्सव समितीच्या अध्यक्षपदी पवन कातकडे यांची निवड करण्यात आली. तर महिला अध्यक्षपदी महिला नगरसेविका भाग्यश्री ढोमसे यांची नियुक्ती करण्यात आली. या बरोबरच कार्याध्यक्षपदी भूषण कदम, उपाध्यक्ष - संदेश जगताप, गौरव केदारे तर सरचिटणीसपदी अमर वजरे यांची नियुक्ती करण्यात आली. महिला उपाध्यक्षपदी छाया देवांग तर चिटणीसपदी विशाल डोखे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.