शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

दोन भावंडांनी तयार केली विजेवर चालणारी सायकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2020 10:57 PM

दिंडोरी : स्पर्धेच्या आणि संगणकाच्या युगात वावरत असताना शाळेत मिळणारे ज्ञान आणि त्यावर केलेल्या चिंतनाच्या आधारावर बुद्धीचा वापर करीत राजारामनगर येथील कादवा इंग्लिश स्कूलमध्ये शिकणाऱ्या दोन चुलत भावंडांनी विजेवर चालणारी सायकल तयार करून अन्य विद्यार्थ्यांसमोर आदर्श उभा केला आहे.

ठळक मुद्देआंबे वरखेडा : परिसरात विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक

दिंडोरी : स्पर्धेच्या आणि संगणकाच्या युगात वावरत असताना शाळेत मिळणारे ज्ञान आणि त्यावर केलेल्या चिंतनाच्या आधारावर बुद्धीचा वापर करीत राजारामनगर येथील कादवा इंग्लिश स्कूलमध्ये शिकणाऱ्या दोन चुलत भावंडांनी विजेवर चालणारी सायकल तयार करून अन्य विद्यार्थ्यांसमोर आदर्श उभा केला आहे.लॉकडाऊनच्या काळात सध्या शाळा बंद असून, ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी भरपूर वेळ मिळत असून, या वेळेचा सदुपयोग करून काही विद्यार्थी भविष्याचा वेध घेत आहेत. आंबे वरखेडा येथील कृष्णा राजेश वडजे (इयत्ता दहावी) व शिवम ज्ञानेश्वर वडजे (इयत्ता सहावी) या दोन्ही चुलत बंधूंनी केवळ तीन हजार रुपयांच्या टाकाऊ वस्तूंचा वापर करीत इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या सायकलीचा नावीन्यपूर्ण प्रयोग यशस्वी केला आहे.चार्जिंगवर चालणाऱ्या सायकली उपलब्ध आहेत; परंतु त्यांच्या किमती सर्वसामान्य लोकांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाहीत. कृष्णा वडजे याने आठवीला असताना ब्लोअर तयार केले होते. चार्जिंगवर स्कूटर चालते यापासून प्रेरणा घेऊन आपणही इलेक्ट्रिकवर चार्जिंग करून चालणारी सायकल बनवू शकू, असा निश्चय मनाशी केला. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले. सायकलला चार्जिंग बॅटरी बसविण्यासाठी एकूण तीन हजार रुपये खर्च आला. यासाठी लागणाऱ्या १२ व्होल्ट बॅटरी व २५० व्हॅट मोटर, एमसीबी स्विच, १.५ नंबर वायर, बाइकच्या इंजिनचे स्पॉकेट घेतले. तसेच इंजिनमधील टायमिंग चैन घेतली. मोटरीचे माप घेत सायकलला मोटर बसविण्यासाठी लोखंडाची पट्टी बसविली. त्या पट्टीला छिद्र पाडले व सायकलच्या पुढच्या चाकाला वेल्डिंग करून तेथे मोटर बसविली. स्पॉकेट चाकाला जोडले. टायमिंग चैन मापानुसार कमी करून मोटर बसविली. त्यानंतर बॅटरी ठेवण्यासाठी स्टँड तयार करून त्यास फिट केली. एमसीबी स्वीच ब्रेकजवळ व वायर बॅटरीला जोडली. अशा पद्धतीने सर्व जोडणी झाल्यानंतर बॅटरी चार्ज करून सायकल ३० मिनिटात ५ किलोमीटर अंतरापर्यंत सायकल बॅटरीवर चालली.सदर प्रयोगाबद्दल या दोन्ही विद्यार्थ्यांचे कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, व्हाइस चेअरमन उत्तम भालेराव, सर्व संचालक व परिसरातून कौतुक केले जात आहे.

टॅग्स :Grammy Awardsग्रॅमी पुरस्कारRural Developmentग्रामीण विकास