वणी : दुचाकीचा अपघात झालेल्या युवकांना धमकावत ६५ हजाराची दुचाकी व २ हजार रु पये रोख असा ६७ हजाराचा ऐवज लुटल्याच्या आरोपावरु न संगनमताने जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन याप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र सिताराम वाघमारे (रा. कुकुडमुंडा, ता. सुरगाणा) हे वणी- सापुतारा रस्त्यावरु न दुचाकीवर जात असताना करंजखेड फाट्यावर दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यात ते दुचाकीवरु न खाली पडले. दोघांनाही मार लागला. त्याच सुमारास निलेश अण्णा बस्ते (रा. शिंदवड, ता. दिंडोरी) व दिनेश रामजी पवार (रा. राजभवन, सुरगाणा) हे दोघे त्याठिकाणी आले. त्यांनी जखमींना मदत करण्याऐवजी वाघमारे यांच्या पाकीटातुन २हजार रूपये रोख व ६५ हजाराची दुचाकी घेऊन गेल्याची फिर्याद वाघमारे यांनी दिली. पोलिसांनी या दोघा संशयितांवर जबरी लुटीचा गुन्हा दाखल करु न त्यांना अटक करण्यात आली आहे.
जबरी लूट करणाऱ्या दोघा संशयितांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2019 3:34 PM
जबरी लुटीचा गुन्हा दाखल
ठळक मुद्देजखमींना मदत करण्याऐवजी वाघमारे यांच्या पाकीटातुन २हजार रूपये रोख व ६५ हजाराची दुचाकी घेऊन गेल्याची फिर्याद