नाशिक : मगरीच्या आठ पिल्लांसह गोड्या पाण्यातील दुर्मीळ कासवांच्या (ब्लॅक पॉण्ड टर्टल) तस्करीचा सौदा गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने जागतिक वन्यजीव सप्ताहच्या पहिल्याच दिवशी सोमवारी (दि.१) उधळला. जुन्या नाशकातील कोकणीपुरा भागात या दुर्मीळ वन्यजिवांची बोली लावली जात असल्याची माहिती आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली. याप्रकरणी दोघा संशयित तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
वन्यजीव सप्ताहाच्या प्रारंभी रोखली मगर-कासवांची तस्करी; दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 17:26 IST
यावेळी त्यांच्या संवादावरून साध्या वेशात त्यांच्या आजूबाजूला बसलेल्या पोलिसांचा संशय बळावला. यावेळी संशयित फैज गयासुद्दीन कोकणी (२०, रा. कोकणीपुरा), सौरभ रमेश गोलाईत (२०, रा. जेलरोड) हे दोघे हॉटेलमधून बाहेर पडले. यावेळी कोकणी याच्या हातात खोका असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
वन्यजीव सप्ताहाच्या प्रारंभी रोखली मगर-कासवांची तस्करी; दोघांना अटक
ठळक मुद्देपुढील तपास वनविभाग पश्चिम नाशिक व गुन्हे शाखा संयुक्तरीत्या करत आहेत.‘खाकी’चा हिसका दाखविल्यानंतर संशयितांनी कबुली दिली.