सटाणा : शहरातील मध्य वस्तीत राहणारे मायलेक कोरोना संशयित आढळल्याने सर्वत्र घबराटीचे वातावरण पसरले आहे. हे मायलेक दाभाडी येथील कोरोना पॉझिटिव्ह डॉक्टरच्या पत्नी आणि मुलगी असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांच्या संपर्कात आलेल्या तिघांचे घरातच विलगीकरण केले आहे.शनिवारी दाभाडी येथील डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह ठरल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील, पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत कापडणीस यांनी तत्काळ या रुग्णांच्या पत्नी व मुलीचा शोध घेऊ दाभाडी येथील विलगीकरण केंद्रात भरती करण्यात आले आहे. हे मायलेक शहरातील मध्यवर्ती भागात राहत असलेल्या नातेवाइकांकडे गेल्या दहा दिवसांपासून वास्तव्यास होते. प्रशासनाने तत्काळ त्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविले आहेत. ते कोणाकोणाच्या संपर्कात आले होते त्यांचाही प्रशासन शोध घेत आहेत.शहरासह तालुक्यात मालेगाव, मुंबई, पुणे, दिल्ली येथून कोणी नातेवाइकांकडे वास्तव्यास असेल, त्यांची माहिती तत्काळ प्रशासनाला कळवावी. कोणी नंतर बाधित आढळल्यास अशांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे तहसीलदार इंगळे यांनी सांगितले.या संशयितांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले असून, ते अद्याप प्राप्त झालेले नाही.
सटाणा शहरात दोन संशयित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2020 9:03 PM
सटाणा : शहरातील मध्य वस्तीत राहणारे मायलेक कोरोना संशयित आढळल्याने सर्वत्र घबराटीचे वातावरण पसरले आहे. हे मायलेक दाभाडी येथील कोरोना पॉझिटिव्ह डॉक्टरच्या पत्नी आणि मुलगी असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांच्या संपर्कात आलेल्या तिघांचे घरातच विलगीकरण केले आहे.
ठळक मुद्देसंशयितांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले