नाशिक : लॉकडाऊन काळात सातत्याने नागरिकांच्या दुचाकी गायब करणारे दोघा चोरट्यांना भद्रकाली पोलीसांच्या पथकाने बेड्या ठोकून त्यांच्याकडून २लाक १५ हजार रुपये किंमतीच्या चोरी केलेल्या आठ दुचाकी हस्तगत करण्यास यश मिळविले आहे.लॉकडाऊन काळात व आता लॉकडाऊन शिथिलतेनंतर बेरोजगारीमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे गुन्हेगारीच्या घटनांमध्येही वाढ होऊ शकते, असे जाणकारांचे मत आहे. लॉकडाऊन काळात नागरिकांच्य दारासमोरून दुचाकी गायब करणारे जुने नाशिकमधील संशयित सुनील बाबासाहेब देशमुख (३०,रा.कोळीवाडा, सारडासर्कल) यास भद्रकाली पोलिसांच्या पथकाने वरिष्ठ पोलीस निरिक्षक साजन सोनवणे यांच्या आदेशान्वये ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याचा दुसरा साथीदार जाकीर अख्तर शेख (३६,खडकाळी) याच्या मदतीने महादेव कॉम्प्लेक्स सीबीएसवरून फिर्यादी विजय एकनाथ पालवा (२४) यांची प्लेझर मोपेड दुचाकी (एम.एच.१५ सीआर १९०४) चोरी केल्याची कबुली दिली. त्यास पोलिसांनी या गुन्ह्यात अटक करून पोलीस कोठडीत अधिक चौकशी केल्यानंतर त्याच्याही साथीदाराच्या मुसक्या बांधल्या. संशयित जाकीरकडून पोलिसांनी हिरो होंडा प्लेझर (एम.एच.१५ सीआर १९०४), हिरोहोंडा सीडी डिलक्स (एम.एच१५ सीडब्ल्यू ८७०४), बजाज एक्सीड (एम.एच४१ एल२५३९), हिरोहोंडा स्ट्रिट (एम.एच१५ एडी २९६७), महिंद्र गस्टो (एम.एच३९ एस ६७९६), हिरो होंडा पॅशन (एम.एच१५ अेडब्ल्यू९१९९), स्पेलेंडर (एम.एच१५ बीबी ९८७२ या दुचाकी हस्तगत करण्यास पोलिसांना यश आले. यापैकी एक चोरीची दुचाकी सरकारवाडा पोलिस ठाणे हद्दीतून लंपास केली असून त्याचा गुन्हाही दाखल आहे. या चोरट्यांकडून भद्रकाली व सरकारवाडा या दोन पोलीस ठाण्यांमध्ये दाखल दुचाकी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहे. याबाबत पुढील तपास पोलीस करत आहेत.
आठ दुचाकी हस्तगत : जुने नाशिकमधील दोघे चोरटे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2020 8:20 PM
या चोरट्यांकडून भद्रकाली व सरकारवाडा या दोन पोलीस ठाण्यांमध्ये दाखल दुचाकी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहे. याबाबत पुढील तपास पोलीस करत आहेत.
ठळक मुद्देभद्रकाली पोलिसांचे यश