‘भारत-बंद’च्या बंदोबस्तासाठी दोन हजार पोलीस रस्त्यावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 12:00 AM2018-09-10T00:00:29+5:302018-09-10T00:19:23+5:30

पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीस आले आहेत़ सरकारच्या नोटाबंदीसह चुकीच्या निर्णयांच्या विरोधात देशभरातील विविध राजकीय पक्षांनी सोमवारी (दि़१०) भारत-बंद पुकारला आहे़ या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह सुमारे दोन हजार पोलीसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे़

 Two thousand policemen on the road to stop the 'India-Band'! | ‘भारत-बंद’च्या बंदोबस्तासाठी दोन हजार पोलीस रस्त्यावर !

‘भारत-बंद’च्या बंदोबस्तासाठी दोन हजार पोलीस रस्त्यावर !

Next
ठळक मुद्देपोलीस अधिकारी : सीआरपीएफ, क्यूआरटी, स्ट्रायकिंग फोर्स तैनात

नाशिक : पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीस आले आहेत़ सरकारच्या नोटाबंदीसह चुकीच्या निर्णयांच्या विरोधात देशभरातील विविध राजकीय पक्षांनी सोमवारी (दि़१०) भारत-बंद पुकारला आहे़ या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह सुमारे दोन हजार पोलीसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे़
भारत बंदच्या बंदोबस्तासाठी शहरात बारा स्ट्रायकिंग फोर्सचे नियोजन (१२० कर्मचारी ) करण्यात आले असून त्यापैकी तीन पोलीस आयुक्तालयात रिझर्व्ह असणार आहेत़ तर उर्वरीत नाशिकरोड, भद्रकाली, अंबड, पंचवटी, सातपूर या पोलीस ठाण्यांसह संवेदनशील द्वारका, पाथर्डी फाटा, हॉटेल जत्रा चौफुली या ठिकाणी तैनात असणार आहेत़ याबरोबरच चार एसआरपीएफ तुकड्या (भद्रकाली, नाशिकरोड, पंचवटी, राखीव) बोलविण्यात आल्या असून, आयुक्तालयाच्या सर्व शाखांतील (तक्रार निवारण, वेल्फेअर, आदी) अधिकारी व कर्मचारी हे पोलीस गणवेशात हजर असणार आहेत़ याबरोबरच शीघ्र कृती दलाचे जवान राखीव ठेवलेले आहेत़ याबरोबरच निपयंत्रण कक्षात पाच ते सहा वाहने तत्पर असणार आहेत़
शहरात पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह सुमारे दोन हजार पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी रस्तयावर असणार आहेत़
बसस्थानकांना रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सचा वेढा
राजकीय पक्षांमार्फत पुकारण्यात येणाºया बंदमध्ये लालपरीवर निशाना साधला जात असल्याचे आतापर्यंतचे वास्तव आहे़ त्यामुळे रविवारी रात्रीपासूनच शहरातील सीबीएस, ठक्कर बाजार, महामार्ग, निमाणी, पंचवटी डेपो याठिकाणी रॅपीड अ‍ॅक्शन फोर्स (आरसीपी) तैनात करण्यात आली आहे़

Web Title:  Two thousand policemen on the road to stop the 'India-Band'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.