वणी : येथील उपबाजारात कांद्याला मंगळवारी ३३११ रु पये प्रती क्विंटलचा दर मिळाला. गेल्या काही दिवासांपासुन कांद्याच्या दरात सातत्याने बदल होत असुन हळूहळु दर घसरले आहेत. उपबाजारात २०५० क्विंटल कांद्याची आवक झाली. कमाल ३३११ किमान,२००० तर सरासरी ३६५० रु पये प्रती क्विंटल असा दर उत्पादकांना मिळाला. २३२ वाहनामधुन कांदा विक्र ी साठी उत्पादकांनी आणला होता. राजस्थान, गुजरात व मध्यप्रदेश या राज्यांमधे उत्पादित कांद्याची आवक तेथील बाजारसमीत्यांमधे होत आहे. मोठ्या प्रमाणावर खरेदी करणाऱ्या राज्यांना पुरेसा पुरवठा करण्यासाठी व हा कांदा खरेदीसाठी तसेच वाहतुकीसाठी सोयीचा असल्याच्या गणितामुळे देशांतर्गत अपेक्षित मागणी कमी झाली आहे. त्याचाच परिणाम दर घसरणीवर झाल्याची माहिती देण्यात आली आह. काही दिवसांपुर्वी कांदा दहा ते बारा हजार रु पये क्विंटलपर्यंत पोहचला होता मात्र आता परिस्थिती बदलली आहे. त्यात निर्यात बंदी असल्याने त्याचाही परिणाम दरावर होत आहे.
वणीत दोन हजार क्विंटल कांद्याची आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 3:39 PM