दोन्ही बोगद्यांची लांबी ८ किलोमीटर असून, रुंदी १७.५ मीटर आहे. एफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे प्रोजेक्ट व्यवस्थापक शेखर दास यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंता शक्ती उपाध्याय, राजीव सिंह, एम.एन. राव, परीतकर, पारीख व त्यांच्या १५०० कामगार व १५० अभियंते, अशा टीमने हे शिवधनुष्य पेलले. या बोगद्याने आणखी एक विक्रम नोंदवला असून, ८ किलोमीटरचा हा दुहेरी बोगदा फक्त २ वर्षांत पूर्ण झाला आहे. अभियांत्रिकीच्या इतिहासात भारतात तरी अशी नोंद नसल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.
इन्फो
ऑस्ट्रेलियन तंत्राचा वापर
५५ हजार कोटी रुपयांचा मुंबई- नागपूर समृद्धी महामार्ग ७०० किलोमीटरचा असून, इगतपुरीतील दुहेरी बोगदा हा या महामार्गाचा महत्त्वाचा टप्पा आहे. २७४५ कोटी रुपये खर्च करून हा बोगदा खोदण्यासाठी ऑस्ट्रेलियन तंत्राचा वापर करण्यात आला होता. कसारा घाट पार करण्यासाठी वाहतूक कोंडी नसेल, तर आजघडीला ३० ते ३५ मिनिटे लागतात. मात्र, या बोगद्यातून कसारा घाट पार करण्यासाठी केवळ ५ मिनिटे लागणार आहेत. दोन वर्षांत दुहेरी बोगद्याचे काम पूर्ण झाल्याने एफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या अभियंत्यांनी आनंद व्यक्त केला.
फोटो आहे.....
170921\img-20210916-wa0020.jpg
आनंद व्यक्त करतांना एफकॉन इंफ्रास्ट्रक्चर कंपनीचे प्रोजेक्ट व्यवस्थापक शेखर दास यांच्यासह अभियंते