नाशिकरोड : नेहरूनगर येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या ताब्यातील क्वालिस व मार्शल जीपला शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.रात्रपाळीत कामावर असलेले संदीप सुभाष पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली असता पार्किंगमध्ये उभी असलेली क्वालिस (एमएच १५ एए ३०२८)ला आग लागल्याचे लक्षात आले. पवार यांनी आरडाओरड केल्याने आजूबाजूच्या रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत शेजारी उभी असलेली मार्शल जीपला (एमएच १५, एए ३०२२)देखील आग लागली.सदर घटनेची माहिती अग्निशामक दलाला कळविताच त्यांनी बंबासह घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली.मात्र आगीमध्ये दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आग नक्की कशामुळे लागली याचा उलगडा होऊ शकला नाही. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जळीताची नोंद करण्यात आली आहे. शनिवारी दुपारी पोलीस प्रशासनाच्या न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोग शाळा पथकाने तपासणी करून माहिती घेतली.
आगीत दोन वाहनांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:10 IST