विंचूर : शहरात कोरोनाचा विळखा वाढत असून, एकाच दिवसात दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या तीन झाली आहे.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे निवृत्त चालक व विंचूरचे माजी सरपंच यांची गेल्या २१ जुलै रोजी प्रकृती बिघडली होती. त्यांना नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिथे दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावू लागली. मोठ्या प्रमाणात श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते; परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.दुसरा रुग्ण हा ५४ वर्षीय शेतकऱ्याला त्रास जाणवू लागल्याने त्यास लासलगाव ग्रामीणरु ग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या चार-पाच दिवसांपासून ते मराठा विद्या प्रसारकच्या आरोग्य विद्यापीठात उपचार घेत होते. सोमवारी सायंकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अगोदरदेखील येथील एक रु ग्ण कोरोनामुळे दगावला आहे.विंचूरसारख्या छोट्या शहरात कोरोनाचे तीन बळी गेले आहेत. विंंचूरमध्ये कोरोना रु ग्णांचीसंख्या ६१ वर पोहोचली असून, १४ रु ग्णांवर उपचार सुरू आहेत. तर पाच रु ग्णांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.
विंचूरला एकाच दिवसात कोरोनाचे दोन बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2020 10:22 PM
विंचूर : शहरात कोरोनाचा विळखा वाढत असून, एकाच दिवसात दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या तीन झाली आहे.
ठळक मुद्दे या अगोदरदेखील येथील एक रु ग्ण कोरोनामुळे दगावला आहे.