------------
चौकांमधील डावे
वळण खुले करावे
नाशिक : महानगरातील स्मार्टरोडवरील चौकांमध्ये डाव्या बाजूचे वळण घेणाऱ्या रस्त्यांना बंद करण्यात आल्याने नागरिकांना अनेकदा ट्रॅफिक जामचा त्रास सहन करावा लागतो. ज्या नागरिकांना डाव्या बाजूला वळायचे असते, त्यांनादेखील रस्त्यात विनाकारण थांबून रहावे लागते. स्मार्टराेडच्या नावाखाली डावीकडील वळण रस्तेच बंद करण्यात आले असल्याने तो सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
------
पदपथ विक्रेत्यांनी
व्यापले रस्ते
नाशिक : महानगरातील मुख्य बाजारपेठेतील बहुतांश रस्ते हे पदपथ विक्रेत्यांनी व्यापले असल्याने नागरिकांना बाजारपेठेतून चालण्यासाठी मुख्य रस्त्याचाच वापर करावा लागतो. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांच्या गर्दीत पादचाऱ्यांची अधिक भर पडून संपूर्ण रस्ताच ठप्प होण्याचे प्रकार अनेकदा घडत आहेत.
-------------
वाहनांचे रस्त्यांवर
पार्किंग ठरते अडथळा
नाशिक : सारडा सर्कल परिसरात स्थापलेल्या दुकानांसमोर अनेकदा दुचाकी, चारचाकी उभ्या राहत असल्याने त्या रस्त्यावरून अन्य वाहनांना वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. प्रारंभी केवळ दुकानांजवळील भागात होणारे पार्किंग आता थेट मुख्य रस्त्याचा पावपेक्षा अधिक भाग व्यापू लागल्याने वाहतुकीत अनेकदा अडथळे निर्माण होत आहेत.
----
शेकोट्या पेटू लागल्या
नाशिक : जिल्ह्यासह महानगराच्या परिघातील गावठाण भागांमध्ये थंडीचा कडाका वाढू लागल्याबरोबर शेकोट्यादेखील पेटू लागल्या आहेत, तर शहरात अनेक मोठ्या सोसायट्यांमधील वॉचमनदेखील रात्रीचे शेकोट्या पेटवून थंडीपासून बचावाचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत.
-----