वडील किसनलाल कलंत्री यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अरुण व सुनील कलंत्री यांनी दहा वर्षांपूर्वी सुमारे दीड लाख रुपयांचे रुग्णसेवा साहित्य दिले. यानंतर वेळोवेळी त्यात त्यांनी साहित्याची भर घातली. आजवर वाचनालयास सुमारे दोन लाख ५० हजार रुपये किमतीचे रुग्ण साहित्य त्यांनी दिले आहे. वॉटर बेड, ऑक्सिजन सेट, वॉकर, कुबडी, टॉयलेट चेअर, स्टीलबेड, व्हीलचेअर आदी साहित्याचा त्यात समावेश आहे. गरजू रुग्णांना हे साहित्य विनामोबदला अल्पअनामतीवर वापरण्यासाठी दिले जाते. उत्तम दर्जाच्या व्हीलचेअर मिळाल्याने वाचनालयाला रुग्णसेवेसाठी उपयुक्त ठरतील, असे सांगून वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत यांनी अरुण व सुनील कलंत्री यांचे आभार व्यक्त केले. यावेळी कार्यवाह हेमंत वाजे व संचालक चंद्रशेखर कोरडे उपस्थित होते.
फोटो ओळी- ०१ सिन्नर ४
सिन्नर सार्वजनिक वाचनालयास कलंत्री परिवाराकडून दोन व्हीलचेअर भेट देण्यात आल्या. त्याप्रसंगी कृष्णाजी भगत, हेमंत वाजे व चंद्रशेखर कोरडे आदी.
===Photopath===
010621\01nsk_30_01062021_13.jpg
===Caption===
सिन्नर सार्वजनिक वाचनालयास कलंत्री परिवाराकडून दोन व्हीलचेअर भेट देण्यात आल्या. त्याप्रसंगी कृष्णाजी भगत, हेमंत वाजे व चंद्रशेखर कोरडे आदी.