सिन्नर : तालुक्यातील मेंढी-सांगवी रस्त्यावर शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास बिबट्याने दुचाकी-स्वारावर हल्ला करत जखमी केले. गेल्या महिन्याभरात बिबट्याने दुचाकीवर हल्ला करण्याची ही चौथी घटना आहे. त्यामुळे शेतकºयांत दहशत पसरली आहे.सांगवी येथील रमेश एकनाथ घुमरे व निफाड तालुक्यातील ब्राह्मणवाडे येथील अरुण डिके दुचाकीने सांगवीकडे जात असताना सदर प्रकार घडला. सांगवी शिवारात रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने दुचाकीवर हल्ला केला. त्यात रमेश घुमरे यांच्या पायाला जखम झाली. अचानक बिबट्याने हल्ला केल्याने दुचाकी घसरून पडली. यामुळे घुमरे यांच्या तोंडाला जखम झाली. मात्र प्रसंगावधान राखून घुमरे यांनी दुचाकी पुन्हा सावरत बिबट्याच्या तावडीतून सुटका करून घेतली. त्याच्यावर नगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भोजापूर खोºयातील चास शिवारात यापूर्वी बिबट्याने दुचाकीस्वारांना लक्ष केले होते. त्यानंतर गेल्या आठवड्यात वडांगळी-कीर्तांगळी रस्त्यावर बिबट्याने दर्शन दिले. तालुक्यात बिबट्यांचे प्रमाण वाढले असून, रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकºयांत चिंता व्यक्त केली जात आहे.
मेंढी येथे बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 12:09 AM
सिन्नर : तालुक्यातील मेंढी-सांगवी रस्त्यावर शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास बिबट्याने दुचाकी-स्वारावर हल्ला करत जखमी केले.
ठळक मुद्दे बिबट्याने दुचाकीवर हल्ला केलाबिबट्याने दुचाकीस्वारांना लक्ष केले