शुक्रवारी (दि. ८) रात्री दहा वाजेच्या सुमारास ढेपले हे त्यांच्या दुचाकीने (एमएच १५ एफसी १७५७) मुंबई-आग्रा मार्गावरून प्रवास करत असताना, वाघ कॉलेजसमोर त्यांच्या पाठीमागून आलेल्या टेम्पोने (युपी ८५ बीटी ७०७९)ने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या धडकेत सुदैवाने त्यांचे प्राण वाचले. या प्रकरणी आडगाव पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---
कुरापत काढत पंचवटीत टोळक्याकडून हल्ला
पंचवटी : जुनी कुरापत काढून चाैघांनी मिळून एकास बेदम मारहाण केल्याची घयना पंचवटी परिसरात घडली. या प्रकरणी मंगेश मधुकर बागुल (रा. दिंडोरी रोड) यांनी दिलेल्या फिर्यावरून पंचवटी पोलीस ठाण्यात संशयित बाळा निपुंगे, आतिष बोडके, शिवम थोरात, आकाश झुरडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी (दि. ८) रात्री दहा वाजेच्या फिर्यादी व त्याचा भाऊ हे येथील एका वडापाव विक्रीच्या दुकानाजवळ उभे असताना संशयितांनी तेथे येऊन ‘तू आम्हाला पाहिजेच होता’ असे म्हणत कुरापत काढत शिवीगाळ व मारहाण केली. यातील दोघांनी बाजूला पडलेला दगड उचलून फिर्यादी यांच्या डोक्यावर मारला व जीवे ठार मारण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
--------
द्वारकेवर बसच्या धडकेत दाम्पत्य जखमी
नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या एका बसचालकाने भरधाव बस चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत, एका दुचाकीस्वार महिलेला धडक दिल्याची घटना द्वारकेजवळील समांतर रस्त्यावर घडली. सुदैवाने या अपघात दुचाकीस्वार पुष्पा मदनदास बैरागी व त्यांचे पती मदनदास बैरागी यांचे प्राण वाचले. या अपघाताप्रकरणी बैरागी यांनी बसचालक संशयित मंगेश देवीदास पालखे (औरंगाबाद बस डेपो) यांच्याविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानुसार, पालखेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी (दि. ९) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास बैरागी हे त्यांच्या पत्नीसोबत दुचाकीने (एमएच १५ इएन ९३८९) द्वारका येथून समांतर रस्त्याने मार्गस्त होत होते. यावेळी भरधाव आलेल्या बसनच्या (एमएच २० बीएल ३८९९) चालकाने त्यांच्या दुचाकीला कट मारल्याने त्यांचा तोल जाऊन अपघात झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.