नाशिक : मखमलाबाद शहरातील मातोरी रस्त्यावर दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या अपघातात मुंगसरा येथील अशोक नाना वायचळे (५५) यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत मोटारचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मुंगसरा येथे राहणारे अशोक वायचळे हे काल सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास त्यांच्या ताब्यातील मोपेड दुचाकी (एम एच०४ सीएस ४२०३) मातोरी रोडवरुन जात असताना पाठीमागून आलेल्या एका चारचाकीने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. त्यात त्यांच्या डोक्याला हाताला पायाला गंभीर मार लागल्याने त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर मोटारचालकाने घटनास्थळावरून वाहन घेऊन पलायन केले.
मखमलाबादला मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 19:11 IST
मुंगसरा येथे राहणारे अशोक वायचळे हे काल सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास त्यांच्या ताब्यातील मोपेड दुचाकी (एम एच०४ सीएस ४२०३) मातोरी रोडवरुन जात असताना पाठीमागून आलेल्या एका चारचाकीने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.
मखमलाबादला मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
ठळक मुद्देचारचाकीने दुचाकीला जबर धडक दिली.मोटारचालकाने घटनास्थळावरून पलायन केले.