पळसे दारणा संकुल येथील रहिवासी असलेला हेमंत हा नाशिक रोड येथे एका मेडिकलमध्ये नोकरीला होता. त्याने काही दिवसांपूर्वीच नवीन दुचाकी खरेदी केली होती. मंगळवारी (दि. १४) तो त्याच्या दुचाकीने (एमएच १५ - एचपी २५८५) पळसे गावाच्या दिशेने दुपारच्या सुमारास घरी जेवणाकरिता जात होता. या वेळी चेहेडी येथील जुन्या जकात नाक्यासमोर पाठीमागून वेगात आलेल्या आय़शर ट्रकने (एमएच ४२ - बी ८९०५) त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत हेमंत गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळून मृत्युमुखी पडला. अपघातानंतरही ट्रकचालकाला ट्रकवर नियंत्रण मिळविता आले नाही आणि ट्रक महामार्ग व सर्व्हिसरोडच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकावर जाऊन आदळला. ट्रकचालक मद्यधुंद अवस्थेत होता. नागरिकांनी मयत हेमंतसह ट्रकचालकाला बिटको रुग्णालयात आणले. या वेळी घटनेची माहिती मिळताच नाशिक रोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, निरीक्षक गणेश न्याहदे यांनी पोलिसांसह अपघातस्थळी व रुग्णालयात धाव घेतली. मद्यधुंद ट्रकचालकामुळे निष्पाप युवकाचा बळी गेल्याने नातेवाईक व मित्रांनी आक्रोश करीत राग व्यक्त केला. हेमंतच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
140921\14nsk_56_14092021_13.jpg~140921\14nsk_57_14092021_13.jpg
अपघातग्रस्त ट्रकवमयत हेमंत कुमावत~अपघातग्रस्त ट्रकवमयत हेमंत कुमावत