नाशिक : शहरातील सोमेश्वर कॉलनीतून दुचाकी चोरणाºया अनंत उर्फ बटाट्या एकनाथ वानखेडे (रा. मुपो. हतनूर, ता. भुसावळ, जि. जळगाव) यास जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जयदीप पांडे यांनी नऊ महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़ सातपूरच्या महिंद्र कंपनीतील कामगार अमोल बोरसे (सोमेश्वर कॉलनी, सातपूर) यांची पल्सर दुचाकी (एमएच-१५- बीक्यू- ६८३५) ५ सप्टेंबर २०१७ रोजी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमधून चोरट्यांनी चोरून नेली होती़ याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ पोलीस हवालदार बी़ पी़ गिते यांनी केलेल्या तपासात आनंद ऊर्फ बटाट्या याने ही दुचाकी चोरल्याचे समोर आले़ त्याच्याकडून दुचाकी जप्त करण्यात आल्यानंतर १९ सप्टेंबर रोजी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते़ सरकारी वकील एस़ आऱ सपकाळे यांनी घेतलेले साक्षीदारांचे जबाब, परिस्थितीजन्य पुरावे यावरून वानखेडेविरोधात आरोप सिद्ध झाले़ त्यानुसार न्यायाधीश पांडे यांनी नऊ महिने १५ दिवस सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़सिडकोतून दुचाकीची चोरीसिडकोतील पाटीलनगरमधील रहिवासी राहुल महाजन यांची दुचाकी (एमएच १५, ईएन ७४९४) चोरट्यांनी पाटीलनगर मैदानाबाहेरील विद्युत रोहित्राजवळून १६ जुलै रोजी चोरून नेली़ या प्रकरणी दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
दुचाकी चोरणाऱ्यास नऊ महिने सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:08 AM