शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
3
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
5
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
6
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
7
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
8
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
9
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
10
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
11
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
12
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
14
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
15
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
16
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
17
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
18
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
19
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
20
Gold-Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

मतदार जागृतीसाठी दुचाकी रॅली

By admin | Published: February 20, 2017 12:21 AM

ंमनपा निवडणूक : विविध संस्थांचा सहभाग

नाशिक : महापालिका निवडणुकीत मतांचा टक्का वाढविण्यासाठी आयोजित ‘होय, मी मतदान करणारच’ या उपक्रमांतर्गत महापालिकेसह विविध संस्था - संघटनांच्या वतीने दुचाकी रॅली काढण्यात आली.  महापालिका निवडणुकीत सन २००७ मध्ये मतदानाची टक्केवारी ६० टक्के होती, तर ती २०१२च्या निवडणुकीत तीन टक्क्यांनी घटून ५७ टक्के झाली. यंदा मतांचा टक्का वाढविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने विशेष अभियान हाती घेतले आहेत. त्याअंतर्गत मतदार जागृती केली जात आहे. राज्यात नाशिकने मतदानाच्या टक्केवारीत विक्रम प्रस्थापित करावा यासाठी मतदार जागृती करण्यासाठी विविध संस्था-संघटनांच्या वतीने दुचाकी रॅली काढण्यात आली. त्यात नाशिक महापालिका, कविता राऊत फाउंडेशन, नाशिक सिटिझन्स फोरम, नाशिक इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (निमा), अंबड इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (आयमा), नाशिक येझदी जावा क्लब आणि क्रुझिंग गोंडस् या संस्थांचा सहभाग होता.  सकाळी १० वाजता महात्मानगर मैदानापासून दुचाकी रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. भोसला मिलिटरीजवळील लोकमत सर्कल, कॉलेजरोड, कॅनडा कॉर्नर, शरणपूररोड, राजीव गांधी भवन, जुने सीबीएस, जिल्हा न्यायालय, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, रेडक्रॉस, शालिमार, सारडा सर्कल, गडकरी चौक, चांडक सर्कल, मायको सर्कल, एबीबी सर्कल या मार्गे रॅली नेऊन परत महात्मानगर मैदानावर समारोप झाला. ‘होय, मी मतदान करणारच’ असे फलक हाती घेऊन निघालेली ही दुचाकी रॅली लक्षवेधी ठरली.  यावेळी मतदार जागृतीसाठी महापालिकेने नियुक्त केलेल्या संदेशदूत आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत या सहभागी झाल्या होत्या. तसेच नाशिक सिटिझन्स फोरमचे अध्यक्ष सुनील भायभंग, जितेंद्र ठक्कर, विजय संकलेचा, संदीप जाधव, नितीन उपासनी, महेश तुंगार, मकरंद उदावंत, अंबरीश मोरे आदि सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)